पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे : सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशनच्या हादीत वाहन चोरी च्या अनुशंगाने तपास पथकातील पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोना ७३५१ बोडरे व पोशि 8342 पाटील पोशि १०५१० शेडगे यांना याच्या खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की. एक इसम गाजा सिटी रोड कॅनोल जवळ थांबला असुन त्याने अंगात पोपटी रंगाचा शर्ट रंगाची ट्रेक पैन्ट घातलेली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी ती वरिष्ठांना कळवून वरिष्ठानी योग्यती कारवाई करण्याचे आदेशित केल्याने सदर बातमीच्या ठिकाणी जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता बातमीत नमुद वर्णनाचा एक इसम कनाल जवळ पांढऱ्या रंगाची मोपेड अॅक्टीव्हा गाडी घेवुन लेला दिसला आमची बातमीप्रमाणे खात्री होताच त्यास आमची येण्याची चाहुल लागू न देता त्यास आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता *शिया ऊर्फ सुमन शंभु चक्रवती* वय २२ वर्षे रा. सध्या बकोरी फाटा रॉयल पार्क वाघोली पुणे मुक राहणार मणियारा सरकारी शाळे जवळ बनगा ता. बनगा जि. धोविसपरगणा राज्य कलकत्ता, असे सांगितले, त्यानंतर त्याचेकडे ताब्यात असलेल्या मोपेड अॅक्टीव्हा गाडीचे कागदपत्र व लायसन्स बाबत विचारणा केली असता तो काही न बोलता कायया बावऱ्या नजरेने इकडे तिकडे पाहुन उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यांचा आम्हांस संशय आल्याने त्याचेकडे त्याचे ताब्यातील मोपेड गाडी बाबत अधिक तपास करता त्याने सदरची मोटार सायकल ही पब्लीक मॉल सिहगडरोड पुणे येथुन चोरल्याचे सांगितले असता सदरबाबत सिंहगडरोड पो स्टे येथील खात्री केली असता गुन्हा रजि नं ४७६/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे समजले त्याचेकडे अधिक तपास करता विमानतळ पोलीस स्टेशनचे २ गुन्हे लोणीकंद पोलीस स्टेशनचे २ गुन्हे व सहकारनगर पोलीस स्टेशनचा १ गुन्हा सिंहगडरोड पो स्टेशनचे २ असे एकूण ०८ गुन्हे उघडकीस आणुन एकुण २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला असून पुढील तपास *सपोनि निकम* सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी *मा. अमिताभ गुप्ता सो, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर मा. संदिप कणिक सो, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा.राजेंद्र डहाळे सो पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. सुहेल शर्मा सो, पोलीस उपआयुक्त परीमंडळ ३ श्री सुनिल पवार सो सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री शैलेश सखे सो वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयंत राजुरकर सो. पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, अमित बोडरे, अमोल पाटील, सागर शेडगे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल जोलेकर, स्वप्नील मगर अविनाश कोडे, विकास बांदल. विकास पांडुळे* यांचे पथकाने केली।

