श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठा अंतर्गत विविध महाविद्यालयाच्या खोखो स्पर्धेचे आयोजन आदित्य अंनतंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे दिनांक 15 व 16 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित केल्या होत्या सदरील स्पर्धेत आदित्य कृषी महाविद्यालय बीड उपविजेते पद तर कृषी महाविद्यालय मरखेल जिल्हा नांदेड यांनी पटकवले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्य डॉ. अदितीताई सारडा मॅडम व विद्यापीठाचे खोखो प्रभारी प्रा. शाहू चव्हाण, कब्बडी प्रभारी डी एफ राठोड सर तर निवड समिती सदस्य प्रा गुलबीले सर, रणजित जाधव सर यांनी केले व तसेच आदित्य शिक्षण संस्थाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. मुंडे सर अंनतंत्रज्ञान महाविद्यालयचे प्राचार्या श्याम भूतडा, कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ. सावंत, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय चे अमोल सानप, जैव तंत्रज्ञान डॉ कचरे, दंत महाविद्यालय चे डॉ हिमांशू, फार्मसी महाविद्यालय चे डॉ. हिंगणे उपस्थित होतं.
सदरील स्पर्धेत ऐकून 18 संघनी भाग घेतला. सदरील स्पर्धेचे नियोजन, भोजनाचे नियोजन बदल विदयापीठ चे खो खो प्रभारी शाहू चव्हाण सर, राठोड सर व गुलबीले सर यांनी महाविद्यालय कौतुक केले व महाविद्यालय आभार मानले. सदरील कार्यक्रमचे सूत्रसंचालन गर्जे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्याम भूतडा यांनी मानले.