Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाचा खटला नगरऐवजी ठाणे किंवा नाशिक येथील न्यायालयात चालवा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 17, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाचा खटला नगरऐवजी ठाणे किंवा नाशिक येथील न्यायालयात चालवा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

अहमदनगर:- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाची सुनावणी सुरू झाली तेव्हापासून मीडिया ट्रायल म्हणजेच माध्यमांच्या वृत्तांकनामुळे सुनावणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत हा खटला नगरऐवजी ठाणे किंवा नाशिक येथील न्यायालयात चालवावा अशी मागणी मुख्य आरोपी बाळ बोठे पाटील याने औरंगाबाद खंडपीठात केली आहे.

यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या हत्या प्रकरणात सुरूवातीला ज्ञानेश्वर उर्फ गुडू शिवाजी शिंदे श्रीरामपूर, फिरोज राजू शेख राहूरी, आदित्य सुधाकर चोळके कोल्हार बुद्रुक, सागर भिंगारदिवे आणि ऋषिकेश पवार नगर या 5 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर फरार असलेल्या मुख्य आरोपी बाळ बोठे याला हैद्राबाद येथून अटक केली. तसेच, फरार असताना बोठेला मदत करणार्‍या जनार्दन अकुला चंद्रप्पा रा. रामनगर, हैद्राबाद, पी.अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी रा.हैद्राबाद, राजशेखर अजय चाकाली रा.आंध्र प्रदेश, शेख इस्माईल शेख अली रा. आंध्रप्रदेश, अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ रा.आंध्र प्रदेश व महेश वसंतराव तनपुरे नगर या सहा जणांचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. खटल्यातील 12 आरोपींपैकी महिला आरोपी पी.अनंतलक्ष्मी सुब्बाचारी अद्यापही पसार आहे.

जरे हत्याकांडाची नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यापासून मीडियाच्या वृत्तांकनामुळे खटल्याच्या सुनावणीवर प्रभाव पडत असल्याचे बाळ बोठे याने औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. खटल्याची सुनावणी ठाणे किंवा नाशिक न्यायालयात करण्याच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्याचे समजते. न्यायालयाकडून सरकारी पक्षाला सुनावणीसाठी हजर राहण्या बाबत समन्स बजावण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

गुन्ह्यातून वगळण्यावर 22 ला निर्णय
बाळ बोठेला फरार असताना कोणतीही मदत केली नसल्याने, गुन्ह्यातून वगळण्यात यावे, असा अर्ज राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ तिघेही रा.आंध्र प्रदेश या आरोपींनी केला आहे. या अर्जावर बुधवारी दि.16 सुनावणी पार पडली असून, न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावर 22 नोव्हेंबरला निर्णय होणार आहे.
गुन्ह्यातून वगळल्यास साक्षीदारांवर दबाव
बाळ बोठेला फरार असताना आरोपींनी मदत करण्यासोबतच मोबाईल व सीमकार्ड उपलब्ध करून दिल्याने पोलिसांच्या कारवाईत अडथळे निर्माण झाले, तसेच गुन्ह्यातून आरोपींना वगळल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची भीती असल्याचा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. यादव पाटील यांना मदतनीस म्हणून अ‍ॅड.सचिन पटेकर यांनी काम पाहिले.

Previous Post

वर्धा जिल्हातील वार्षिक योजनेचा जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा बैठक.

Next Post

भारत विकास परिषदेचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भारत विकास परिषदेचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा.

भारत विकास परिषदेचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In