देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
हिंगणा:- भारत विकास परिषद, विदर्भ प्रांताचा वार्षिक स्नेहमीलन सोहळा नुकताच पार पडला. १२ शाखेतील मुख्य कार्यकारिणी, विशेष अतिथींच्या या सोहळ्याप्रसंगी पश्चिम क्षेत्रीय अध्यक्ष सुधीर पाठक, विदर्भ प्रांत अध्यक्ष चंद्रशेखर घुशे, पश्चिम शाखेचे प्रथम अध्यक्ष जनरल वैद्य, विदर्भ प्रांत महासचिव पद्माकर धानोरकर आणि वित्त सचिव संजय गुळकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
विदर्भ प्रांताचा वार्षिक स्नेहमीलन सोहळाच्या कार्यक्रम राम मंदिर नजीकच्या भ्रातृ मंडळ सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमात पश्चिम क्षेत्र संमेलन ‘उत्कर्ष’मध्ये उल्लेखनीय सहकार्य करणाऱ्या १०० सहकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्नेहमीलन सोहळ्यात उपस्थित सदस्यांनी सादर केलेल्या चारोळी, गीत आणि नकलांनी उपस्थितांची मने जिंकली. स्नेहभोजनाने सोहळ्याची सांगता झाली.

