सौ. हनिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपूर :- शहरामधून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना बल्लारपूरमध्ये समोर आली आहे. फुलसिंग नाईक वार्डातील रहिवासी 55 वर्षीय शिक्षक दत्ता नारायण अक्केवार यांनी सहावीत शिकणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्यूशनसाठी आलेल्या विद्यार्थिनीला शिक्षिकाने बेडरुममध्ये बोलावून अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केले, मात्र दुसरीकडे आरोपी शिक्षकाने स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगून असे सांगितले. त्याच्या विरुद्ध कट करण्यात येत असून मी निर्दोष आहे.
बल्लारपूर शहरातील थापर शाळेत शिकवणारे 55 वर्षीय शिक्षक गरीब मुलांना शिकवण्यासाठी घरी मोफत शिकवणी वर्ग घेत असते, या शिक्षकाने शिकवणीसाठी आलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला बोलावून घेतले. त्यावेळी त्या शिक्षकाने त्या मुलीबरोबर अश्लील कृत्य केल त्यावेळी विद्यार्थिनीने विरोध करत तेथून निघून गेली.
मात्र दुसऱ्या दिवशीही शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत असेच कृत्य केले. त्यानंतर विद्यार्थिनीने हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला, कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर विद्यार्थिनीने आरोपी शिक्षकाच्या विरोधा पोलिसाना बयान देऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षका विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे, तर दुसरीकडे शिक्षक याला आपल्या विरोधातील कट म्हणत आहेत.