मधुकर गोंगले. गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली:- आदिवासी विद्यार्थी संघ ही शोषित, वंचित व पिढीतांच्या न्याय हक्कांसाठी प्रामाणिक पणे लढणारी निरंतर सामाजिक चळवळ असून या सामाजिक चळवळीतून तयार होणारे प्रत्येक कार्यकर्ता हे आदिवासी विद्यार्थी संघासाठी कणा असल्याचे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम केले. ते एटापल्ली तालुक्यातील कसनसुर येथे आदिवासी विद्यार्थी संघाकडून आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कसनसुर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याचे अध्यक्ष आविसचे जेष्ठ सल्लागार तथा भूमिया गिस्साजी मडावी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आविसचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम, मुख्य अतिथी म्हणून आविसचे जिल्ह्याचे नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून एटापल्ली तालुका आविस अध्यक्ष नंदुभाऊ मट्टामी,आविस सल्लागार तथा माजी जि.प.सदस्य कारूजी रापंजी,आविस सल्लागार तथा माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके, आविसचे जेष्ठ सल्लागार रैजी मडावी कसनसुर, आविस जेष्ठ सल्लागार शंकरजी दासरवार, कसनसुर सरपंचा कमलताई हेडो, बेबीताई हेडो,छायाताई हिचामी, मंदाताई गेडाम, वनिताताई शेंडे, माजी प.स.सदस्य श्री मंगेश हलामी, बाळू मडावी उपसरपंच गुरुपल्ली, श्रीकांत चिप्पावार आविस तालुका उपाध्यक्ष, प्रज्वल नागुलवार, अजय गावडे, ग्राप सदस्य गुरुपल्ली अजय मडावी, माजी सरपंच डोलेश मडावी, माजी सरपंच शिवाजी हेडो, माजी सरपंच विजय कुसनाके, आविस सल्लागार विशाल रापेल्लीवर, संदीप बडगे, अमित येनपरेड्डीवार, पुणेश कंदिकुरवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यकर्ता मेळाव्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते थोर महात्म्यांचे प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यकर्ता मेळाव्यात आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मेळाव्याचे प्रास्तविक आविस तालुका अध्यक्ष नंदू मट्टामी तर संचालन व आभार राजू गोमाडी यांनी मानले.
या कार्यकर्ता मेळावा यशस्वी आयोजनासाठी आविस सल्लागार व वेंनहाराचे ग्रामसभा अध्यक्ष सुधाकर गोटा, ग्रामसभा सचिव राजू गोमाडी, मा. सरपंच सुनील मडावी, राकेश बोलंमपल्लीवार, संजय वेळदा, नीलकंठ निकोडे, नागसाय गावडे, मैंनू लेकामी, सुरेश मट्टामी, विलास कोंदामी, नरेश गावडे, प्रकाश पुंगाटी, ज्ञानेश्वर गोटा सह ग्रामसभा व आविसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

