पुणे मुंबई दरम्यानच्या १५ रेल्वे साेमवारपर्यंत रद्द हजारो प्रवासाना फटका.
वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
पुणे:- तुम्ही पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणार असणार तर सावधान. रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे दिनाक १९ आणि २० नोव्हेंबर रोजी तांत्रिक कामामुळे मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे दि. १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या १५ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे, अशी माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.
अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्याने हजारो प्रवासी अडकून पडनार आहे. अनेक प्रवास्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे या दोन दिवसात ट्रेनने प्रवास करणार असाल तर खबरदारी घ्यावी. असे आव्हान महाराष्ट्र संदेश न्युज सर्व नागरिकांना करत आहे.
यात शनिवारी दि. १९ धावणाऱ्या पुणे – मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस -१२१२८, कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस -१७४१२ आणि रविवारी धावणाऱ्या मुंबई – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस – १२१२७, मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेस -११००९, मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेस -१२१२५, मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस – १२१२३, मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस – १७४११, पुणे – मुंबई सिंहगड एक्स्प्रेस -११०१०, पुणे – मुंबई डेक्कन क्वीन – १२१२४, पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस-१२१२६, पुणे – मुंबई डेक्कन एक्स्प्रेस-११००८, पुणे – मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस-१२१२८; तर सोमवारी धावणारी मुंबई – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस या सर्व रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहे. यात १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी दादरपर्यंतच धावणारी रेल्वे पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस २२१०६ ही रद्द केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348