वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
पुणे:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुणे येथील येरवडा कारागृहात कार्यरत असलेल्या हवालदार आणि एका महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका कैद्या कडून लाच घेतली म्हणून बेड्या ठोकल्या आहे. या दोघांवर संचित रजेवर (पॅरोल) असलेल्या कैद्याकडून 50 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
लाचखोरीच्या भस्म्या रोग जळलेल्या लोकांना प्रत्येक गोष्टीत लाच स्वीकारण्याची सवय झाली असते. अशा लोकांमुळे सर्व प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला जातो. असेच लाचखोर हवालदार बाजीराव जोतीबा पाटील वय 54 वर्ष याच्यासह 48 वर्षीय महिले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका शिक्षा झालेल्या कैद्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती की, त्याला संचित रजा मंजूर करण्यात आली असून सध्या तो कारागृहाबाहेर आहे. खुल्या कारागृहात कैदी शिक्षा भोगत आहे. हवालदार बाजीराव पाटील यांनी कैद्याला 50 हजार रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास खुल्या कारागृहातून मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात येईल तसेच गैरवर्तणुकीचा अहवाल कारागृह प्रशासनास पाठविण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी कैद्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली.
तडजोडी अंती कैद्याने 15 हजारांची लाच देण्याचे मान्य केले. कारागृहात कैद्यांसाठी उपाहारगृह आहे. उपाहारगृहातील कर्मचारी महिलेकडे लाचेची रक्कम देण्यास पाटील यांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पाटील व महिलेस ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त श्रीहरी पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे तपास करत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

