पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर
पुणे : दिनांक १९/११/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड सहा पो निरीक्षक शैलजा जानकर व स्टाफ असे सिंहगड रोड पो स्टे कार्यक्षेत्रात ब्रम्हा हॉटेल चौकातुन रामनगरकडे जाणा-या सार्वजनिक रोडवर पायी पेट्रोलिंग करीत असताना अखिल ओमकार मित्र मंडळ गणेश मंदिरा समोरील सार्वजनिक रोडवर इसम नामे १) आकाश महेंद्र ठाकर वय २२ वर्षे, रा. सनसिटी, भारती बाजारसमोर, विश्व मेडिकल फ्लॅट नं.६ आनंदनगर हिंगणे पुणे. २) अनिकेत जनार्दन धांडेकर वय २० वर्षे, रा. आनंद विहार कॉलनी नंबर १ स्नेहल जोशी यांचे दवाखान्याजवळ, सिंहगड रोड, हिंगणे खुर्द पुणे. पैकी आकाश महेंद्र ठाकर हा त्याचे ताब्यात किं.रु. ४७.६५०/- रु चे ४७ ग्रॅम ६५० मिलीग्रॅम चरस हा अंमली पदार्थ एक मोबाईल हॅण्डसेट १०,०००/- चे एक पेंशन प्लस दुचाकी क्रमांक क्र एम एच १२ इ के ००३७ कि रु २०,०००/- असा ७७,६५०/- रु चा व अनिकेत जनार्दन धांडेकर याचे ताब्यात ८६.४००/- रु किमतीचा ०५ ग्रॅम ७६० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व एक आय फोन कि.५०,०००/- रु चा १,३६,४००/- असा एकुण कि.रु. २.१४,०५०/- चा ऐवज व अंमली पदार्थ संगणमताने अनाधिकाराने, बेकायदेशिर रित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे. सदरचा मेफेड्रॉन (एम.डी.) व चरस हा अंमली पदार्थ त्यांनी सोशल मिडिया व्दारे दोन अज्ञात इसमांकडुन विकत घेवुन त्याची सोशल मिडीया व्दारे पुणे शहरामध्ये विक्री करीता घेतला असल्याचे त्यांचेकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये आदुळन आल्याने त्या दोघांचे तसेच इतर दोघां विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.४८४ / २०२२. एन.डी.पि.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब).ii(अ), २१ (ब). २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, सचिन माळवे संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

