पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
रात्री १०/०० वा. नंतर राजा बहादुर मिल बंडगार्डन परीसरात मोठया आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे One 8 कम्युन बार व मिलर्स लक्झरी क्लब, पुणे या हॉटेलवर कारवाई साऊंड सिस्टीम, डि.जे. मिक्सर जप्त.
दि. १९.११.२०२२ रोजी बंडगार्डन परीसरात पेट्रोलिंग करीत असताना राजा बहादुर सिटी सेंटर ब्रॅन्ड शेरेटॉन हॉटेलच्या मागे मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले..
त्यांनतर सदर ठिकाणी खात्री केली असता One 8 कम्युन बार व मिलर्स लक्झरी क्लब, पुणे या हॉटेल मध्ये मोठया आवाजात सांउड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे आढळल्याने सदर हॉटेलवर कारवाई करून ०१,७०,०००/- रु. किचे (एक लाख सत्तर हजार ) किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आले असुन पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २००० ) अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
यापुढेही सदर अशा प्रकारच्या कारवाई करण्यात येणार आहेत. सदर ठिकाणी ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे..
सदरची कारवाई श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे, श्री अमोल झेंडे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सहा.पो.निरी.. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, इरफान पठाण व संदीप कोळगे या पथकाने यशस्वी केली आहे.