Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात गोवरने हाहाकार माजविल्या, आता पर्यंत चाळीसहून अधिक रुग्ण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 23, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात गोवरने हाहाकार माजविल्या, आता पर्यंत चाळीसहून अधिक रुग्ण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- मुंबईमध्ये गोवर आजाराने धुमाकूळ घातल्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात गोवरने हाहाकार माजविल्याचे समोर येत आहे. त्यात आता पर्यंत चाळीसहून अधिक रुग्ण आढळल्याचे समोर आले होते. नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मालेगावनंतर आता गोवरने नाशिक शहरातही पाय पसरवले आहे गोवरचे चार संशयित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

राज्यातील अनेक भागात गोवर आजाराचा धोका वाढला असून राज्यभर जनजागृती केली जात आहे. सर्व जिल्ह्यांमधील आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. आता नाशिक शहरात चार संशयित रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. रक्ताचे नमुने मुंबईला पाठविण्यात आले आहे. गोवरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास संपूर्ण शहरात सर्वेक्षण केले जाणार आहे. गोवरचा धोका वेळीच रोखण्यासाठी नाशिकमध्ये आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील काही मोजक्याच शहरात गोवरचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा वेळीच उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारून उपाययोजना करत आहे. मालेगावमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून अनेकांनी यामध्ये लस न घेतल्याने गोवरचे रुग्ण आढळून आल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे. त्यामध्ये आता नाशिकमधील स्थिती बघता मुंबईवरुण चार संशयितांचे अहवाल कधी येतात याकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागून आहे. नाशिक महानगर पालिका आणि जिल्हा परिषद यांच्या आरोग्य विभागाने आशा, सर्वेक्षण अधिकारी यांच्यामार्फत ही स्थानिक पातळीवर आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

आरोग्य यंत्रणेला माहिती द्या..
गोवरची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेला माहिती द्या, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ताप, सर्दी आणि खोकला आला तरी त्या बाळाचे निरीक्षण केले जात आहे. ज्या बालकांचे लसीकरण झालेले नाहीत, अशा बालकांचा शोध घेतला जात आहे, त्यांना लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मुंबईतून संशयित बालकांचा अहवाल काय येतो यावर पुढील कार्यवाही अवलंबून असणार आहे. कोविड काळात अनेक बालकांना लसीकरण देण्यास पालकांनी टाळाटाळ केल्याची चर्चा होती, त्यात गोवरची साथ आल्याने पालकांमध्येदेखील भिती निर्माण झाली आहे.

Previous Post

जनावरांची अवैध वाहतूक प्रकरण, ठाणेदारा पाठोपाठ दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबन.

Next Post

“बाभळीचा बांध” (वास्तविक मराठी कविता)

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
“बाभळीचा बांध” (वास्तविक मराठी कविता)

"बाभळीचा बांध" (वास्तविक मराठी कविता)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In