युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस रा. यु. काँ नागपूर जिल्हा ग्रामीणची आढावा बैठक मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
नागपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची नुसतीच गणेश पेठ येथील पक्ष कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रामुख्याने माजी मंत्री श्री. रमेशचंद्र बंग, युवा नेते व जिल्हा परीषद सदस्य श्री. सलील दादा देशमुख, जिल्हाध्यक्ष श्री. शिवराज (बाबा) गुजर, कार्याध्यक्ष श्री. राजाभाऊ राऊत, रा. यु. काँ. जिल्हाध्यक्ष आशिष पुंड, प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते प्रविण कुंटे पाटील, पूर्व विदर्भ विद्यार्थी आशिष आवळे, महिला अध्यक्ष सौ. अर्चना ताई हरडे, सावनेर विधानसभाध्यक्ष किशोर चौधरी, शहराध्यक्ष रा यु. काँ शैलेंद्र तिवारी, या प्रसंगी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात पक्ष वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत केली पाहिजे, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेस पक्ष आघाडीवर असला पाहिजे या साठी सर्व कार्यकर्ते कामाला लागा. अशे मार्गदर्शन केले.

