राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- येथून काँग्रेस पक्षाच्या गोट्यातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. गोंडपिपरी येथील नगर पंचायतचे नगरसेविका सौ. शारदा खेमचंद गरपालिवार व खेमचंद गरपालिवार यांनी 24 नोव्हेबर ला भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केल्याने कांग्रेस पार्टीला एक मोठा खिंडार पडला आहे.
सुधीरभाऊ मुनगंटीवार वने, संस्कृती कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री याच्या नेतृवांत विश्वास ठेवत गरपालिवार दांपत्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या वेळी उपस्थित माजी ज़ि प सदस्य अमर बोडलावार, चेतन गौर नगरसेवक गट नेता, दीपक सातपुते माजी सभापती, लक्ष्मी बालुगावर सरपंच, सुनील घाभर्डे उपसरपंच नाना यलेव वार, राहुल चौधरी, बंटी बोनगीरवार यांची उपस्थिती होती.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

