सौ. हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ माजवणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर, रत्नापूर येथील एका नराधम युवकाने आपल्याच घराशेजारी राहणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. ही घटना बुधवारी दोन दिवसांनी मुलीची आंघोळ करून देताना आईला संशय आल्याने ही घटना उघडकीस आली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज डी. कुंभरे वय 21 वर्ष, रा. इंदिरानगर, रत्नापूर याने दोन दिवसांपूर्वी शेजारी राहाणाऱ्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केला. मुलगी लहान असल्याने कुणालाही काही सांगितले नाही. दोन दिवसांनंतर मुलीची आंघोळ करून देताना आईच्या लक्षात ही बाब आली आणि मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस विभागाकडे तक्रार दाखल केली.
सिंदेवाही येथील पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी घटनास्थळी येऊन अधिक तपास केला व आरोपी सूरज कुंभरे याला ताब्यात घेतले. मुलीला चंद्रपूर येथे नेऊन वैद्यकीय तपासणी केली व आरोपीवर 376 व पाॅस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास घारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

