पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
पुणे :- दिनांक २२/११/२०२२ रोजी मुंढवा पोलीस ठाणे तपास पथकाला गोपनीय बातमीदार मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की इसम नामे निलेश काळे हा गावठी कट्टा विक्रीसाठी जहांगीर चौक ते अबेडकर चौक दरम्यान घोरपडी पुणे येथे येणार आहे. सदरची बातमी खात्रीलायक असलेने तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री जोरे यांनी लागलीच ती बातमी मुंढवा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री अजित लकडे यांना कळवून त्यांनी कारवाईचे आदेश दिलेने त्यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सापळा रचुन इसम नामे निलेश भाऊराव काळे, वय २५ वर्षे, रा. गोकुळनगर, स्वामी समर्थ मंदीरामागे कात्रज पुणे मुळ गाव अहमदनगर यास मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी शिताफिने ताब्यात घेवुन खातरजमा केली असता त्याचे ताब्यात १ नग गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळुन आली, त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याचेकडुन आणखी एक गावठी बनावटीचे पीस्टल व ०१ जिवंत काडतुस असे मिळुन एकुण ०२ पिस्टल आणी ०३ जीवंत काडतुस जप्त करण्यात आले असुन त्याचेविरुध्द मुढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नंबर ३१० / २०२२ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असून त्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे करीत आहेत. आरोपीत इसम निलेश भाऊराव काळे यास मा. न्यायालयासमोर हजर करणेत आले असता मा. न्यायालयाने त्याची दिनांक २६/११/२०२२ रोजी पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली असुन तपास चालू आहे.
मुंढवा पोलीस ठाणे यांनी यापुर्वीच दिनांक ०१ / ११ / २०२२ रोजी देखील इसम नामे अविनाश सुनिल जगताप, वय २९ वर्षे, रा.चव्हाण चाळ, गोपी मेडिकल शेजारी २२६ मंगळवार पेठ पुणे याचे कब्जात १ पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळुन आल्याने त्यास तपास पथकाने सापळा रचुन त्याचे कब्जात १ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे ताब्यात घेवुन कारवाई केलेली आहे. सदरबाबत मुंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नंबर २८८ २०२२ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अशाप्रकारे श्री अजित लकडे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस ठाणे यांनी प्रभारी पदाचा चार्ज घेतल्यापासुन एकाच महिन्यात मुंढवा पोलीसांनी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांवर वेगवेगळ्या कारवाया केलेल्या असुन त्यामध्ये एकुण ३ गावठी बनावटीचे पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगीरी मा. श्री अमिताभ गुप्ता सो, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. संदिप कर्णीक सो, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. नामदेव चव्हाण सो. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा. श्री विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो परिमंडळ ५ पुणे शहर, मा. श्री बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे श्री प्रदिप काकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक, संदिप जोरे, पोलीस अंमलदार दिनेश राणे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, राजु कदम, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, योगेश गायकवाड, सचिन पाटील यांनी केली आहे.