सकमुरात पुन्हा एकदा काँग्रेस समर्थित पॅनलचाच उपसरपंच.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सकमुर ग्रामपंचायत मध्ये जानेवारी 2021 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित सरपंच व उपसरपंच निवडून आले होते व काँग्रेसचा झेंडा फडकला होता. परंतु अतिक्रमित मुद्द्यावर त्यामधील उपसरपंच अपात्र झाल्याने ग्रामपंचायतिचा कारभार व विकास कामे ठप्प पडले होते.
आज रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. गावातील भरीव विकास साध्य करण्यासाठी व क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या विकास प्रणालीवर विश्वास दाखवून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते श्री.जीवन गणपत अलोने यांनी काँग्रेस समर्थित पॅनेलचे सहकार्य घेतले. सकमुर ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्पणाताई अशोक रेचनकर यांच्या काँग्रेस समर्थित पॅनलचे सहकार्य घेऊन श्री.जीवन अलोने यांची उपसरपंच पदी निवड झाली. क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी नवनियुक्त उपसरपंच व काँग्रेस प्रणित ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
निवडणूक प्रक्रियेत सरपंच सौ. अर्पणा अशोक रेचनकर, उपसरपंच जीवन गणपत अलोने, ग्रा.प. सदस्य अशोक दादाजी रेचनकर, ग्रा.प.सदस्य कुसुम भाऊजी अलोने अशी ग्रामपंचायत सत्ता स्थापन करून सर्वांनी संविधान निर्माते, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वच्छतेचे पुजारी संत गाडगेबाबा यां महात्म्यांच्या मूर्तीची पूजा करून समोरील कारकिर्दीस आशीर्वाद मागितला. त्यावेळी साईराज अलोने, रमेश मुगलवार, पंकज खरेडीवार, माधव अलोने, विनोद जक्कुलवार, किशोर भाऊ यासह गावातील महिला व नागरिक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348