वैशाली गायकवाड उपसंपादक पुणे
पुणे:- एकीकडे महिला सबलीकरणा बाबत बोलले जाते, त्यांच्या न्याय हक्कासाठी बोलले जाते, तर दुसरीकडे मात्र त्याच महिलांबाबत अत्यंत अशोभनीय वक्तव्य केले जाते. असेच वक्तव्य मुंबई मधील एका जाहीर कार्यक्रमात रामदेव बाबाने केले आहे.
या प्रकरणाची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने काल २५ नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घेराव घालून रामदेव बाबावर गुन्हा दाखल करण्यात यावा व कठोर कारवाई करण्यात यावी, आणि संबंधित मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या पर्यंत पोचवण्यात यावे, जर कारवाई झाली नाही तर तीर्व स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा पालकमंत्री यांना देण्यात आला.
तसेच बालगंधर्व पोलिस चौकी येथे रामदेव बाबा विरोधात तिर्व घोषणाबाजी करत त्याच्या फोटोला महिला आघाडीच्या वतीने जोडे मारत संताप व्यक्त करण्यात आला. पुणे पोलिस उपायुक्त परिमंडळ ०१ चे डी सी पी यांची भेट घेत निवेदन देण्यात आले.

