देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
हिंगणा:- तालुक्यातील डेगमा खूर्द येथील जंगलात एका गायी वर वाघाने हमला करुन गायीला ठार मारण्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसर्या दिवशी दिनांक 26 नोव्हेंबरला 5 वाजताच्या दरम्यान गायचे अवयव मुंडके, पाय दिसलेत व मोक्कया वर जाऊंन वन विभागा कडून पंचनामा व मोका चोकशी नोंदविली. त्या वेळेस, प्रवीण घवघवे, वासुदेव करपाते, उकुंडराव भोंडवे, मारोती हुंडीवाले उपस्थित होते. डेगमा हे गांव अति डोगराळ, व जंगलात वसले असुन या गावातिल गायी व म्हशींवर नेहमीच वाघांचे हमले होतात व मृत्यु मुखी पाड़तात,त्यामुळे येथिल नागरिकांमध्य वाघाच्या दहशतीचे वातावरण आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

