✒️मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
हिंगणघाट:- महेश ज्ञानपीठ हिंगणघाट येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुका स्तरावरील शालेय चेस स्पर्धेत महेश ज्ञानपीठ हिंगणघाटची भक्ति संभाजी वाटमोडे, राधा शरद उभाड, कांचन सोगे यांची अंडर १९ चेस आणि पूर्वी धर्मदास गाढ़वे अंडर १४ चेस जिल्हास्तरीय चेस स्पर्धा करिता निवड यांनी यश संपादन करून शाळेला नाव लौकीक मिळवून दिला.
हिंगणघाट येथे आयोजित तालुका स्तरीय चेस स्पर्धेत १९ वर्षे व १४ वर्ष स्पर्धा होऊन यात त्यांनी यश संपादन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडी बद्दल त्यांनी या विजयाचे श्रेय शालेचे व्यवस्धापक, प्राचार्या तथा क्रिडा शिक्षक मुस्तफा हबीब बख्श सर, सचिन मुले सर प्रणिता चिंतलवार व सर्व शिक्षक वृंदांना दिले. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.