पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हेशाखा, पुणे शहर
पुणे :- दिनांक २५/११/२०२२ रोजी अंगली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व अंमलदार परिमंडळ – १,२,३ कार्यक्षेत्रामध्ये अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढणे करीता पेट्रोलिंग करीत असताना, दत्तवाडी रोड सार्वजनिक रोडवर आरोपी नामे नरेंद्र रामदास बोराडे, वय ३३ वर्षे,रा. अचानक चौक, मुक्ताई रेसीडेन्सी फ्लॅट नं. १०३ जिल्हा परिषद शाळेजवळ, उत्तमनगर, पुणे हा त्याचे ताब्यात कि.रु.१०,३८० /- चा ५१९ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आलेने त्याचे विरुद्ध दत्तवाडी पो. ठाणे, पुणे गुरनं २७५/२०२२ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क) २०(ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन, नमुद आरोपीस अटक करुन पुढील तपासकामी दत्तवाडी पो.ठाणे, पुणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदर दिवशी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना सुंदरराव शंकरराव भेलके पथ, भेलकेनगर कमानीजवळ, कोथरुड, पुणे येथील सार्वजनिक रोडवर आरोपी नागे- १) रोहन रत्नाकर दळवी, चय- ३० वर्षे रा. फ्लॅट नं. ए९ सुंदर गार्डन, भेलकेनगर, कोथरुड, पुणे व २) कुणाल रमेश पाटील वय-३२ वर्षे रा. फ्लॅट नं. ११०२ सी-१ विंग, भुमी स्लिव्हरिओ देहु आळंदी रोड, लक्ष्मी चौकाजवळ, मोशी, पुणे यांचे ताब्यात एकुण किं.रु. ५.६५,७५०/- चा ऐवज त्यामध्ये किं.रु.४,५९,६३०/- चा एकुण २९ ग्रॅम ९५० मिलीग्रॅम वजनाचा एम.डी. अंमली पदार्थ, एक मोटार सायकल, ०३ मोबाईल हॅण्डसेट, एक पोर्टेबल इलेक्ट्रीक वजनकाटा व इतर ऐवज अनाधिकाराने बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने व सदरचा (एम.डी.) हा अंमली पदार्थ हा इसम नामे- इम्रान हसीन सय्यद रा. तळोजा याचेकडुन विक्रीकरता आणल्याची माहिती दिल्याने, वरील नमुद तिघांचे विरुद्ध कोथरुड पो. ठाणे, पुणे गुरनं २७१ / २०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करून, नमुद दोन आरोपीस अटक करुन पुढील तपासकामी कोथरुड पो. ठाणे, पुणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे..
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त, श्री. संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री अमोल झेंडे, सहा पी आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे, यांचे मार्गदर्शन व सुचना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा. पो निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोजकुमार सानुके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदिप शिर्के, नितेश जाधव, विशाल: दळवी, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगेश मोहिते यांनी केली आहे.

