प्रशांत जगताप, संपादक
नागपूर/हिंगणघाट:- कॅमोन फिल्मस च्या सौजण्याने निर्मिती होणाऱ्या आगामी मराठी फेस्टिव्हल चित्रपटाचे नाव “फादर अँड डाँटर” या चित्रपट साठी संपूर्ण विदर्भातील ग्रामीण भागातील वेगवेगळ्या उद्योयमुख कलाकारांची निवड करण्यासाठी हिंगणघाट शहरातील डॉ. बी आर आंबेडकर समता सांस्कृतिक युवा मंच वाचनालय काजी वार्ड हिंगणघाट येथे भव्य चित्रपट ऑडिशन घेण्यात आले. यावेळी नागपूर, वर्धा, हिंगणघाट तालुक्यातील शेकडो उद्योयमुख कलाकारांनी हे ऑडिशन दिले.
हे ऑडिशन घेण्यासाठी नागपूर येथील प्रसिद्ध साऊथ इंडियन आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता चिरंजीवी आणि समीर बरोबर हिंगणघाट येथील मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी नव्हाते तसेच नाटक मधील बहुमुखी कलाकार प्रसन्नजीत फुलकर यांनी ही बहुमूल्य योगदान दिले.
“फादर अँड डाँटर” या चित्रपटाची निर्मिती कॅमोन फिल्मस च्या सौजण्याने करण्यात येणार आहे, यांचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश ढवले करणार आहे. यासाठी नागपुर मधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि कॉस्ट्यूम डिझायनर सुप्रिया ढोके तसेच कास्टिंगसाठी वरुड येथील प्रसिद्ध अभिनेता आणि कोरियोग्राफर नितीन मनोहरे सह “फादर अँड डाँटर” चित्रपटाची संपूर्ण टीम मेहनत घेत आहेत. तसेच मीडिया पार्टनर सुप्रसिद्ध बाबा डिजीटल ऍडस् आणि राजरत्न हातकर यांचे देखील वेळोवेळी मोलाचं योगदान लाभलंय.
अमरावती ऑडिशनला भरघोस उत्तर.
या आगोदर अमरावती जिल्ह्य़ातील वरूड येथे या विभाग ऑडिशनसाठी आली होती. एकूण कलाकारांनी ऑडिशनला भरघोस उत्तर दिले. अनेक कलाकारांनी ऑडिशनमध्ये आपली कला सादर करून जजेस ला आकर्षित केले.
“फादर अँड डाँटर” या चित्रपटाची निर्मिती ही विदर्भात करण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी विदर्भातील विविध भागांतील प्रामुख्याने ग्रामीण भागातील युवा व वृद्ध कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे अशा उद्योयमुख कलाकारांसाठी हि सुवर्ण संधी निर्माण करण्यात आली होती. त्यात अनेक गुणी कलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून ऑडिशन घेणाऱ्या जजेसला अवचींत केले.
ऑनलाईन ऑडिशन सुरु आहे.
या चित्रपटासाठी ऑनलाईन ऑडिशन देखील सुरु आहे त्यासाठी पुढील दिलेल्या ई मेल आयडी तसेच व्हाट्सप नंबर वर आपला प्रोफाईल तसेच व्हिडीओ आणि फोटोज पाठवू शकता ,व्हिडिओ किंवा फोटो हे मेकअप न करता अगदी साध्या सरळ वेशात स्पष्ट दिसणारेच स्वीकारले जाणार आहे.
व्हाट्सप नं. 1)समीर: 9284835240
2)नितीन: 86239 21570
3)सुप्रिया: 9325860475
ईमेल:1)fatheranddaughter@gmail.com
2)sameer.fatheranddaughter@gmail.com
3)supriya.fatheranddaughter@gmail.com
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348


