मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक (वणी):- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दुकानातून वस्तू घेऊन घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून युवकाविरोधात वणी पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहे.
एक अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी येत असताना एका दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. वस्तू घेऊन घराकडे येत असताना किरण कडाळे रा. हस्तेदुमाला या युवकाने तिचा हात धरला व तिला धमकी देऊन हस्तेदुमाला शिवारातील डोंगरावर नेत विनयभंग केला.
तेथून मुलीने कशीबशी आपली सुटका केली व घरी येऊन कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने वणी पोलिसांत धाव घेत किरण कडाळे याच्याविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी किरणविरोधात विनयभंग, पोक्सो, शिवीगाळ व मारहाण आदी कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

