देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
नागपूर:- माळी महासंघ हिंगणा तालुका च्या वतीने दिनांक २८ नोव्हेंबर ला सकाळी ९.३० वा. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले चौक महाजन वाडी, वानाडोंगरी येथे श्री.रामकृष्णजी करणकर सेवानिवृत्त अध्यापक यांच्या शुभ हस्ते,श्री. भैय्याजी बनकर, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण येनकर याच्या उपस्थितीत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले व विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित नारायनभाऊ तिवसकर जिल्हा उपाध्यक्ष माळी महासंघ नागपुर ग्रामीण, माळी महासंघ, तालुका अध्यक्ष जयप्रकाश वानखेडे, चंद्रकांतजी वरले, उपाध्यक्ष मोहन आखरे, दिपक करणकर, महात्मा फुले चौक परिवाराचे जेष्ठ मार्गदर्शक भास्करराव निघोट, कनक न्यूज संपादक डॉ.अतुल लांबसोंगे मिलिंद मेश्राम, मुकेश देवगडे, आदी मान्यवर या प्रसंगी महात्मा फुले चौक महाजनवाडी वानाडोगरी मित्र परिवार येथे उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348