✒️संगिता हेंद्रे, सातारा प्रतिनिधी
सातारा:- हार्मनी म्युझिक, सातारा प्रस्तुत गाने जो दिल को छू ले… भाग २३ चे सातारा येथील पाठक हॉल, नगर वाचनालय, राजवाडा येथे उत्साहापूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. त्यात हजारो नागरिकांनी हजेरी लावून या कार्यक्रमाला रंगत आणली.
हार्मनी के संग मन प्रफुल्लीत करणारे क्षण.
या कार्यक्रमात हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार दिग्गज संगीतकार मदन मोहन यांचे “हिटस् ऑफ मदन मोहन” आणि लोकप्रिय हिंदी, मराठी गाणी ग्यायनात आली. त्यामुळे सर्व रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सदाबहार क्षणाचा शेकडो लोकांनी अनुभव घेतला.
या सदाबहार कार्यक्रमाचे कलाकार रविंद्र खांडेकर, सागर जामदार, राजेंद्र पाटील, विद्याधर खांडेकर, अजय घोरपडे, संतोष जिरेसाळ, संगिता हेंद्रे, गितांजली पाटील, रमीजा सय्यद, दुर्गा राजपुरोहित यांनी आपल्या गोड मधुर आवाजाने रशिक प्रेषकाना मंत्रमृग केलं. या कार्यक्रमाचे निवेदिका संगिता हेंद्रे या होत्या.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

