Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

त्र्यंबकेश्वरच्या आधाराश्रमातील बालकाची हत्या आणि पंचवटीतील खासगी वसतिगृहातील मुलींवरील अत्याचार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 29, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
त्र्यंबकेश्वरच्या आधाराश्रमातील बालकाची हत्या आणि पंचवटीतील खासगी वसतिगृहातील मुलींवरील अत्याचार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- त्र्यंबकेश्वरच्या आधाराश्रमातील बालकाची हत्या आणि पंचवटीतील खासगी वसतिगृहातील मुलींवरील अत्याचाराच्या घटना गंभीर आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हा सध्या चर्चेत आहे. बालके व मुलींच्या सुरक्षित जीवनाला प्राधान्य असून, भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत व अनोंदणीकृत बालकाश्रमांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात त्र्यंबकेश्वरच्या तुपादेवी फाटा येथील आधारतीर्थ आश्रमात चारवर्षीय बालकाच्या हत्येची घटना उघडकीस आली. तसेच नाशिक शहरात पंचवटी येथे नोंदणीकृत नसलेल्या खासगी वसतिगृहचालकाने सहा मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. या दोन्ही घटनांमुळे जिल्हा हादरला असून, समाजातील विविध स्तरांतून यावर राेषही व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी लागोपाठच्या घटनांमुळे जिल्ह्यातील बालकाश्रम व वसतिगृहांमधील वास्तव्यास असलेली बालके व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या सर्व प्रकारची गांभीर्याने दखल घेतली आहे.

जिल्ह्यातील बालकांचे संगोपन करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांची नियमित तपासणी केली जाते. मात्र, गेल्या आठवड्यातील दोन्ही प्रकार गंभीर आहेत. त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीतील घटनेबाबत महिला व बालकल्याण तसेच पोलिसांकडून सविस्तर माहिती मागविली आहे. बालके व मुलींची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे. तसेच भविष्यामध्ये असे प्रकार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे गंगाथत्न डी. यांनी स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नोंदणीकृत व अनोंदणीकृत बालकाश्रम व वसतिगृहांची समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण विभागांमार्फत तपासणी केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सखोल तपासणी होणार
जिल्ह्यातील नोंदणीकृत व अनोंदणीकृत संस्थांच्या तपासणीत तेथील रजिस्टर, नोंदणीची कागदपत्रे, आश्रमात बालके व मुलींसाठी पुरविण्यात आलेल्या सुविधांसह अन्य बाबींची तपासणी केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे किमान येत्या काळात त्र्यंबक व पंचवटीसारख्या घटनांना आळा बसणार आहे.

Previous Post

सिन्नर भागात तर बिबट्याने अक्षरशः दहशत, बिबट्याने पोल्ट्रीत प्रवेश करून 200 हून अधिक कोंबड्या फस्त.

Next Post

सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध.

सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In