महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची 2022 ते 2027 ची निवडणूक ही कॉंग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्ष नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, राज्यातील सहकारी बँकांमध्ये अग्रेसर असलेल्या व संगमनेर तालुक्यातील सर्व सामान्य माणसाच्या आर्थिक विकासाची कामधेनू असलेली सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेची निवडणूक ही नेहमी प्रमाणे बिनविरोध झाल्याने अत्याधुनिक प्रणालीने कार्यरत असलेल्या अमृतवाहिनी बँकेने आपली बिनविरोध परंपरा कायम राखत यावेळेस बिनविरोध करीत परंपरा जपली आहे.

