सतीश म्हस्के जालना जिल्हा प्रतिनिधी
जालना:- राज्यात प्रतिंबधीत केलेला गुटखा पान मसाला जर्दा स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी माजलगावकडून परतूरकडे चोरटी माग्राने विक्री व वितरण करण्यासाठी घेवून जाणार असल्याची
माहिती मिळाली होती. पोलिस अधीक्षक च्या
मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश धोंडे व स्टॉफ व पंच असे आष्टी गावात सापळा रचला होता. सदरचे वाहन हे आष्टी गावाकडून परतुर रोड कडे जातांना परतवाडी तांडा जवळ हॉटेल कार्तिक समोर वाहन पाठलाग करुन थांबविले. सदर वाहनामध्ये चालक व मालक असल्याचे दिसून आले. चालक शेख आमेर शेख निजाम वय 26 वर्षे धंदा ड्रायव्हर राहणार खतीब मोहल्ला, अंबा रोड परतूर ता. परतूर जिल्हा जालना व मालक मुजाहिद उर्फ मुज्जु गुलाब खान वय 35 वर्षे धंदा व्यापार राहणार कायमखानी गल्ली परतुर ता. परतुर जिल्हा जालना अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता MH-21-BH-3475 लोडींग वाहनामध्ये 11,66,800 /- रुपये किमतीचा राजनिवास सुगंधीत पान मसाला व जाफराणी जर्दा असा महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिंबधीत केलेला
गुटखा पान मसाला मिळून आला.
सपोनि योगेश धोंडे यांनी पंचासमक्ष 11,66,800 रुपये किमतीचा गुटखा व 8,00,000/- रुपये किंमतीचे वाहन असा एकुण 19,66,800/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांना मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाई करणे कामी पोलिस स्टेशन आष्टी येथे हजर करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे
यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक योगेश धोंडे पोलिस अंमलदार अंबादास साबळे, गजु भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक योगेश धोंडे पोलिस अंमलदार अंबादास साबळे, गजु भोसले, लक्ष्मीकांत आडेप, किरण मोरे सह चालक सुभाष गावडे यांनी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348