✒️युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. लहान मुलांच्या खरेदी – विक्रीच्या रॅकेटमध्ये आज परत एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपी श्वेता उर्फ आयेशा खान तसेच सचिन पाटील या आरोपींच्या चौकशीदरम्यान अनेक खुलासे केले आहे. त्यात एका विधवा महिलेच्या गरीबीचा फायदा उचलत त्यांनी तिला जाळ्यात ओढले त्यानंतर त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील एका दांपत्याला सप्टेंबर महिन्यात चार दिवसांची चिमुकलीची 2 लाख 90 हजारात विक्री केली.
एका गरीब विधवा महिला गर्भवती होती परिस्थिती हलाखीची आणि वरून ती विधवा असल्याने पैशांची गरज होती. तिची गरिबीचा फायदा घेत गर्भवती विधवा सचिन पाटीलच्या संपर्कात आली होती. अनैतिक संबंधातून ती गर्भवती झाली होती. सचिनने तिच्या गरजेचा फायदा घेतला व तिला बालाघाट येथे दोन महिने घेऊन गेला. तिथेच तिची प्रसुती झाली. यादरम्यान त्याने व श्वेताने अहमदाबाद येथील विशाल चंदनानी यांची बहीण मोनिका सुलतीयानी व जावई विजय यांना 8 सप्टेंबरला 4 दिवसाच्या चिमुकलीची विक्री केली. दत्तक प्रक्रिया पूर्ण केल्यावरच ताबा देत असल्याची थाप श्वेताने मारली होती. इतकेच नव्हे तर मुलीचे जन्म प्रमाणपत्र व इतर दस्तावेज पाठविण्यात येईल, असे आश्वासनदेखील दिले होते. मात्र त्यानंतर श्वेता व सचिनने आपले फोन बंद केले.
या खुलाशानंतर पोलिसांनी श्वेता व सचिनसह श्वेताचा पती मकबूल खान, डॉ.प्रवीण सिंग बायस, विशाल चंदनानी, मोनिका सुलतयानी व विनय सुलतयानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुलीची बडोदा येथून सुटका केली असून तिघांनाही ताब्यात घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

