पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे :- दिनांक २९/११/२०२२ रोजी डेक्कन पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहा पोलीस निरीक्षक श्रीमती कल्याणी पाडोळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, डेक्कन पोलीस ठाणे हद्दीत व्हेल माशाची करोडो रुपये किंमतीच्या उलटीची तस्करी होणार आहे. त्यानुसार त्यांनी सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर करपे यांना दिल्याने त्यांच्या मार्गदर्शनानुसार कल्याणी पाडोळे, पो. हवा महेंद्र बोरसे म.पो.ना स्मिता पवार पो.शि चिनय बडगे, पोशि सचिन गायकवाड, असे पथक पंचासह रवाना झाले.
मिळालेल्या खवरीनुसार फम्र्सन कॉलेज बसस्टॉपच्या मागील बाजुस तीन इसम संशयास्पद स्थितीत उभे असताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यात असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेमध्ये व्हेल माशाची उलटीचे (Ambergris) दोन मोठे तुकडे मिळून आले. सदर इसमाकडे सदर व्हेल माशाची उलटी (Ambergris) ही कशाकरिता आणली याबाबत विचारणा केली असता त्यांनी आम्ही सदरची व्हेल माशाची उलटी (Ambergris) ही विक्री करण्याकरिता आणली असल्याचे सांगुन त्याने रस्त्याच्या कडेला त्यांना सदर उलटी बिक्री करण्याकरिता मदत करणारे दोन इसम थांबलेले आहेत असे सांगितलेने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सदर इसमांची नावे पत्ते, विचारता त्यांनी त्यांची नावे १. राकेश राजेंद्र कोरडे, वय-२८, रा. मु.पो अजले ता- दापोली, जि- रत्नागिरी, २. नवाज अब्दुला कुरुपकर, वय-२४, रा- मु.पो अडखळ, अंजले जुईकर मोहल्ला ता- दापोली, जि- रत्नागिरी ३ अजिम महमुद काजी, वय ५० वर्षे, रा.मु.पो. अडखळ, अंजने, जुईकर मोहल्ला ता दापोली, जि. रत्नागिरी यांनी घेऊन येऊन इसम नामे ४. विजय विठ्ठल ठाणगे, वय ५६, धंदा व्यवसाय, रा चैतन्यनगर, रामचंद्र अपार्टमेंट, फ्लॅट नं २०३, धनकवडी, पुणे ५. अक्षय विजय ठाणगे, वय २६ रा सदर असे असल्याचे सांगितले. त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यांचे ताब्यात खालीलप्रमाणे माल मिळुन आला सदर मालाचे वर्णन खालीलप्रमाणे, इसम नामे राकेश राजेंद्र कोरडे, वय २८, रा. मु.पो अजले ता- दापोली, जि-रत्नागिरी, याचे ताब्यात असेलेल्या काळवा
रंगाच्या बॅगेमध्ये व्हेल माशाच्या उलटीचा (Ambergris) तुकडा त्याचे वजन २ किलो ९९४ ग्रॅम इतके कि..रु. २,९९,४०,०००/- २. इसम नाम नवाज अब्दुला कुरुपकर वय २४, रा. मु.पो अडखळ, अंजले, जुईकर मोहल्ला ता- दापोली, जि. रत्नागिरी याचे ताड्यात असेलेल्या मेहंदी रंगाच्या बॅगेमध्ये व्हेल माशाच्या उलटीचा ( Ambergris) तुकडा त्याचे वजन २ किलो २८६ ग्रॅम इतके कि.अ.रु.२,२८,६०,०००/-
३ इसम नामे विजय विठ्ठल ठाणगे, वय ५६, धंदा व्यवसाय, रा. चैतन्यनगर, रामचंद्र अपार्टमेंट, फ्लॅट नं २०३, धनकवडी, पुणे यांचे ताब्यात असलेली एक काळ्या रंगाची हिरोहोंडा स्पेल्डर एन.एक्स जी स्मार्ट दुचाकी
कमांक एम.एच १२ एम. के ९१९३ अशा वर्णनाची कि.अ.रु. ३५,०००/-
एकुण जप्त माल कि. अं. रु ५,२८,३५,०००/-
दिनांक २९/११/२०२२ रोजा डेक्कन पोलीस ठाणेचे हद्दीत फम्युसन कॉलेज बसस्टॉपच्या मागील बाजुस १८.१० वा चे सुमारास व्हेल माशाची उलटीचे (Ambergris) मोठ्या आकाराचे दोन तुकडे इसम नामे १. राकेश राजेंद्र कोरडे, २. नवाज अब्दुला कुरुपकर ३ अजिम महमुद काजी, ४. विजय विठ्ठल ठाणगे, ५. अक्षय विजय ठाणगे यांच्याविरोधात गैरकायदेशिरित्या विक्री करण्याच्या उद्देशानं स्वतःचे नावे कब्जात वाळगलेले स्थितीत मिळुन आले म्हणून त्यांचेविरुद्ध गु.र.नं १६२ / २०२२, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९,४४,४९ (ब), ५१.५७ सह भादवि कलम ३४ अन्वये सरकारतर्फे गुन्हा नोंद केला असून सपोनि कल्याणी पाडोळे, डेक्कन पोलीस ठाणे यांचेकडे पुढील तपास देण्यात आला आहे. यातील इसमांना अटक करून पोलीस कस्टडी घेण्याची तजवीज ठेवली आहे.
सदरची कारवाई श्री राजद डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, श्री. सतीश गोवेकर, सहा पोलीस आयुक्त, फरासखाना / विश्रामबाग विभाग, मुरलीधर करपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन, श्रीमती कल्याणी पाडले, सहा पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, महेंद्र बोरसे मघोना स्मिता पवार, पो.ना सचिन गायकवाड, पो.शि. विनय बडगे, म.पो.शि स्वाहा शेख, पो. शि बाळासाहेब भांगले यांनी मिळून केली आहे.

