Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट नगर पालिकेने नव्याने बांधलेल्या जीबीएमएम शाळेच्या इमारतीत भष्ट्राचार तर नाही? काहीच महिन्यात पडल्या सिलिंग शीट.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 1, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
हिंगणघाट नगर पालिकेने नव्याने बांधलेल्या जीबीएमएम शाळेच्या इमारतीत भष्ट्राचार तर नाही? काहीच महिन्यात पडल्या सिलिंग शीट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

हिंगणघाट:- दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोज सोमवारला सकाळी ठीक ११.०० वाजता “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे “या पक्षाच्या वतीने नगरपरिषद हिंगणघाटच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालय मध्ये स्लॅब व छताचे पाणी मुरल्यामुळे लावण्यात आलेल्या सिलिंग शीट पडले हे माहीत झाल्यावर शिव सेनेच्या वतीने पाहणी केल्यावर आमच्या पाहणीत आले कि, या ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे दरवाजे, सिलिंग च्या शीट,शौचालय चे बोगस काम करण्यात आले आहे. हे आमच्या निर्देशनात आले म्हणून त्या करिता वर्धा जिल्हाप्रमुख अनिल भाऊ देवतारे तथा बाळाभाऊ शहागडकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोले यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देतांना वर्धा जिल्हा संघटक भारत चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमणे, उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, नगरसेवक श्रीधर कोटकर, मनीष देवडे, भास्कर ठवरे, बंटी वाघमारे, शंकर मोहम्मारे, शहर संघटक मनोज मिसाळ, यांची उपस्थिती होती.

निवेदन देण्यापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली असता शाळेचे काय आर्थिक नुकसान झालेले आहे . तेथील सर्व फोटोग्राफ घेण्यात आले व पडलेल्या भागाची पाहणी करण्यात येऊन तिथे विद्यार्थ्यांची विचारपूस करून चौकशी केली असता कुठलीही जीवित हानी झाली नाही याची खात्री करून घेतली. पंरतू नगर परिषदेने तब्बल चार वर्षांपूर्वी आराखडा मंजूर करून, नगरपरिषदची शाळा नव्याने बांधकाम हाती घेण्यात आले होते. त्या बांधकामा करिता शासनाकडून 8 कोटी 80 लाख रुपये खर्च करण्यात आले व ती शाळा नव्याने बांधण्यात आली व तिचे लोकार्पण घाईघाईने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी स्थानिक लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष व येथील लोकप्रतिनिधी(आमदार) तसेच नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची चाचपणी न करता इमारत लोकार्पण कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून दिली. परंतु सदर इमारतीत एवढा दोष असतांना सुद्धा येथील विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याची या लोकप्रतिनिधीना व प्रशासनाला कोणी अधिकार दिला आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने नगरपरिषदचे मुख्य अधिकारी यांनी आपल्या विभागा कडून जाहीर स्पष्टीकरण दिले की, कंत्राटदाराचे सुरक्षा राशी जमा ठेवलेली आहे. परंतु आमचे म्हणणे असे आहे की, कॉन्ट्रॅक्टदाराच्या सुरक्षा राशी असून सुध्दा एकाद्या विद्यार्थीची जीवितहानी झाली तर ती भरून निघेल का? याबद्दल नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी, खुलासा करावा यानंतर देखील अशा परिस्थितीत असे लक्षात येते की, या घटना पुनश्य: होऊ शकते. याला नाकारता येत नाही, याचे कारण आम्ही जरी टेक्निकली नसलो तरी वरतून छताचे जे पाणी टीप टीप गळत आहे त्यावरून असे आम्हाला जाणवले. यावेळी जीवित हानी झाली नाही परंतु असे काही घडल्यास याला जबाबदार कोण राहील याचे स्पष्टीकरण मुख्याधिकारी कंत्राटदार व लोकप्रतिनिधी आमदार यांनी द्यावी! अन्यथा लोकार्पण घेणाऱ्या आमदार, नगराध्यक्ष, कंत्राटदार व मुख्याधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. असे केले नाही तर आम्ही शिवसैनिक मुख्याधिकारी यांचा घेराव करू हे मात्र नक्की. निवेदन देण्याकरिता शिव सेनेचे उपशहर प्रमुख- संजय पिंपळकर, शंकर झाडे, जयंत रोहनकर, लक्ष्मण बकाने, नरेंद्र गूळकरी, विभाग प्रमुख – रुपेश काटकर, सचिन मुळे, मोहन तुमराम, नितीन वैद्य, दिनेश धोबे, अनंता गलांडे, सुनील आष्टीकर, दिलीप चौधरी, आशिष जैस्वाल, देवा शेंडे, भास्कर मानकर, हिरामण आवारी, बलराज डेकाटे, चंदू भुते, गोवर्धन शाहू मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

राहुरी ट्रॅक्टर ट्रेलरचा कट लागल्याने दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, पत्नी जखमी.

Next Post

व्हेल माशाच्या उलटीची (Ambergris) तस्करी करणारे डेक्कन पोलीसांच्या जाळ्यात

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
व्हेल माशाच्या उलटीची (Ambergris) तस्करी करणारे डेक्कन पोलीसांच्या जाळ्यात

व्हेल माशाच्या उलटीची (Ambergris) तस्करी करणारे डेक्कन पोलीसांच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In