सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- शहरातील सर्वांना परीचीत असलेले परिसरातील गोर गरीब नागरिकांना आपल्या रुग्ण सेवेच्या माध्यमातून नेहमी मदत करणारे नागरिकांनसाठी देवदूत असलेले डॉक्टर वसंत साळवे यांचा आज वाढदिवस होता. त्या निमित्याने सामाजिक कार्यकर्त्या आणि बल्लारपूर येथील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी डॉ. वसंत साळवे यांच्या रूग्णालयात जाऊन त्यांना शॉल एवं पुष्पगुच्छ देऊन सम्मानित केले. त्यानंरच्या वाढदिवसाच्या केक कापून उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
डॉ. वसंत साळवे यांनी आपल्या रुग्ण सेवेच्या कर्तव्याच्या जाणिवेतून ‘ऋणानुबंध’ जपले आहे. कर्तव्याची जाण असलेल्या डॉ. वसंत साळवे यांनी आजपर्यंत अनेक गरीब रुग्णाला मदतीचा हात दिला आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ही डॉ. वसंत साळवे यांच्या मधील एक मुख्य दुवा आहे.
या शुभ प्रसंगी उपस्थित असलेल्या माजी शिक्षण सभापती सौ. सारिका कनकम नगर परिषद बल्लारपुर, वरिष्ठ नेता श्रीनिवास सुंचुवार, संजय कोप्परकर, सतीश कनकम, ज्ञानेंद्र आर्या, मनीष रामील्ला, पूनमचंद बहुरिया, हरिबाबू लंका शुभम बहुरिया, बबलू गुप्ता, प्रभदीप सचदेवा, रुपेश कुळमिते, निखिल पोहने, कुलदीप सुंचुवार, पवन कोत्तुर, श्रीकांत पेरका यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होते.

