युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
नागपूर:- थायलंडऊन अष्टधातूची भगवान गौतम बुद्धाची नऊ फूट उंच असलेली मूर्ती दीक्षाभूमी येथे दान करण्यात आली व सात फूट उंच असलेली मूर्ती भगवान गौतम बुद्धाच्या अस्थी बुद्धवन रामगिरी येथे नेत असताना ब्राह्मणी फाटा कळमेश्वर येथे आयुष्यमान उपासक बंडुजी नगराळे व उपासक भैय्याजी नारनवरे यांच्या मुळे ब्राह्मणी वासियांना भगवान बुद्धांच्या अस्थीला नमन करण्याकरीता व भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीला पुष्प अर्पण करण्या चा लाभ घेता आला.
भगवान गौतम बुद्धांच्या या पवित्र वस्ती बुद्ध वन रामगिरी तालुका कळमेश्वर येथे ठेवण्यात येणार आहेत. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अरुण वाहने, सरचिटणीस राहुलजी वानखेडे गुरुजी, ग्रामपंचायत माजी सदस्य वैशाली वाहने, घोराडचे माजी सरपंच भीमरावजी बागडे, दिनेशजी बोरकर, आयुष्यमान विनोद मेश्राम, दामोदर पाटील, बंडूजी डोंगरे, आयुष्यमान वासनिक, आयुष्यमान रामदासजी कापसे, विवेकजी बनसोड, प्रभाकर बागडे इत्यादींनी उद्धव उपासक उपासिका यांनी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्प वाहून अस्थिला नमन केले .

