✒️प्रविण जगताप, विशेष प्रतिनिधी
मो. 9284981757
समुदपुर:- दिनांक 1 डिसेंबर गुरुवार रोजी समुदपुर तालुक्यात ज्या नागरिकांच्या गाई बैल किंवा बकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले त्यातील काही नागरिकांना वारंवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा पाठपुरवठा करत नुकसान भरपाईची रक्कम राजू रणवीर तहसीलदार, समुद्रपूर यांच्या उपस्थिती हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते चेकच्या माध्यमातून अर्थसहाय्य सुपूर्द करण्यात आले.
अर्थसहाय्य मिळणाऱ्या नागरिकांची नावे खालील प्रमाणे.
1) मेघराज मोतीराम नागपुरे, रा. उमरी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा यांचा एक बैल वाहून गेल्यामुळे त्यांना 25हजाराचा चेक देण्यात आला. 2) महादेव शामराव गाडबैल , रा. बापापूर, ता. समुद्रपूर, जि. वर्धा यांचा एक बैल वाहून गेल्यामुळे त्यांना 25हजाराचा चेक सोपविण्यात आला. 3) नीलकंठ रामजी चौधरी, रा. पिपरी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा यांचा एक बैल विजेने मरण पावल्यामुळे त्यांनासुद्धा 25हजाराचा चेक देण्यात आला. 4)रमेश नारायण कोडापे, रा.पुर्ला , ता. समुद्रपूर, जि. वर्धा यांची बैलजोडी विजेने मरण पावल्यामुळे त्यांनासुद्धा 50हजाराचा चेक देऊन साहाय्य करण्यात आले. 5) मनोज लोणारे रा. गिरड, ता. समुद्रपूर, जि. वर्धा. यांच्या 22 बकऱ्या मेल्यामुळे त्यांना 60हजार रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला.