पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
येरवडा पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे :- येरवडा परिसरात मोहनवाडी येथे दि. २९/०६/२०२२ रोजी ते दि. ०२/०७/२०२२ चे दरम्यान फिर्यादी यांचे घरातील कपाटात ठेवलेले १,००,०००/- रु रोख रक्कम तसेच ४०००/- रू किंमतीचे चांदीचे दागिने असा किंमतीचा ऐवज कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे संमतीशिवाय चोरी केली आहे म्हणून येरवडा पो स्टे गुर नं ३१२/२०२२ भादवि ४५४,४५७.३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व पोहवा दत्ता शिंदे, पोना कैलास डुकरे, पोअ प्रशांत कांबळे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम त्यांचेकडे असलेले चोरीचे चांदीचे दागीने विक्री करणेकरीता गांधीनगर येरवडा येथे थांबलेले आहेत. सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरून कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात असताना अतिशय शिताफीने त्यास पकडले. त्यांना त्याचे नाव पत्ता विचारता १. राघु राजु घोरपोट वय २४ रा सध्या सणसवाडी ता शिरूर जि पुणे मुळ पत्ता चिखलठाणा ता जि औरंगाबाद २. अमर रामलु वाहेदलोग वय २६ रा सदर असल्याचे सांगितले. त्यांचेकडे अंगझडतीत मिळालेल्या चांदीच्या वस्तूबाबत चौकशी करता त्यांनी येरवडा परिसरात चोरी केल्याचे कबूल करुन सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपींना दि. २८/११/२०२२ रोजी अटक करण्यात आली आहे. पोलीस कस्टडी दरम्यान त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी
१. येरवडा पो स्टे गु र नं ३१२ / २०२२ भादवि ४५४, ४५७, ३८०, ३४
२. येरवडा पो स्टे गुर नं ३८० / २०२२ भादवि ३९४.३४
३. येरवडा पो स्टे गु र नं ३१८ / २०२२ भादवि ३९४.३४
४. येरवडा पो स्टे गुर नं २०५/२०२२ भादवि ३७९, ३४ असे एकूण ४ गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्यांचेकडून चारही गुन्हयातील मिळून एकूण १,६८,०६०/- रुकिंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री शशिकांत बोराटे साो. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ श्री किशोर जाधव सो सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, श्री. उत्तम चक्रे, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, सपोफी प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना किरण घुटे, अमजद शेख, कैलास डुकरे, सागर जगदाळे, किरण अब्दागिरे, प्रविण खाटमोडे, पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांनी केलेली आहे.

