वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
पुणे:- २०११ साली बाणेर ते पिंपळे नीलख पुल जो पुणे महानगर पालिका व पिंपरी चिंचवड मनपा या दोन्ही महानगरपालिकांच्या हद्दिवरील पुल आहे त्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुल असे नामकरण ठराव मंजूर केले होते. तसे नामकरण फलक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दोन्ही बाजूस लावले आहेत, परंतु पुणे मनपा ने पुलाचे उद्घाटन ५ डिसेंबर २०११ साली पुलाला नाव न देता फक्त राजकीय नेते मंडळींची नावे पुलाच्या उद्धाटन कोनशिलेवर टाकून उद्धाटन केले होते.
या प्रकरणी रमेश ठोसर यांनी पुलाच्या नामकरण बाबतीत दोन्ही महानगरपालिकेत माहिती अधिकार कायदा अंतर्गत माहिती गोळा करून आपल्या नेत्रुत्वाखाली रिपब्लिकन पक्ष औंध भागाच्या वतीने २०११ मध्ये बाणेर ते पिंपळे नीलख यांना जोडणाऱ्या पुलास भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुल असे नाव देण्यात यावे या करिता पुणे महानगर पालिकेवर आंदोलन करण्यात आले,
या आंदोलनाची दखल मुरलीधर मोहोळ महापौर पुणे यांनी घेऊन पुणे महानगर पालिकेत दि.२५ ऑक्टोबर २०२१ रोजी मुख्य ठराव क्र.५२५ नुसार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुल असे नाव देण्यास मान्यता देण्यात आली, परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर पुल असे कोनशिलेवर लोखंडी फलक लावण्यात यावे अशी वारंवार रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी केली,
यावेळी या भागातील नगरसेवक सौ. ज्योती ताई कळमकर, सौ. स्वप्नाली सायकर, सचिन साठे, कैलास दादा गायकवाड, महेंद्र कांबळे शहर अध्यक्ष रिपाइं पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राहुल दादा बालवडकर, शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश तात्या बालवडकर, रिपाई पुणे शहर नेते संजय कांबळे,भाजपा सदस्य सचिन मानवतकर, तुकाराम गाडे, तुकाराम रणदिवे, सिध्दार्थ रणदिवे, अमोल शेलार, शकुंतला ताई शेलार इ, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

