संकलन: ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा !
9823966282
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन! नागपूर:- वाढदिवस केक कापून, धांगडधींगा न करता, समाजात शहर स्वच्छता करणारे, कमीत कमी पैशात रूग्नसेवा करणारे, घर कामगार म्हणून काम करणाऱ्या महिला यांच्या सेवेचा सन्मान, त्यांचे पायधूऊन आणि त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता भेट देऊन आशीर्वाद घेतो.
सर्वधर्मीय प्रार्थना मानवता जागवीणारी, असा वाढदिवस साजरा करणारा नागपूरचा आनंदपाल अंबरते आणि परीवार अभिनंदास पात्र आहे. आई योगीता अनिल अंबरते हात गाडीवर भाजीपाला विकणारी, अनेकांच्या घरातील कौटुंबीक कार्यक्रमात सुग्रास अन्न शीजवीणारी आई, आनंदपालला सुसंस्काराचे धडे देते. वडीलांनी संताची भजने ऐकवीली आणि आनंदमध्ये सेवामय वृत्ती निर्माण झाली. कोरोना महामारीत आई-वडीलांचा एकुलता एक आनंद अनेक कोरोनाग्रस्थ मायबापांना छातीशी लावून जगण्याची नवी उम्मेद द्यायचा. कुटुंब ज्यांची सेवा करण्याची हीम्मत करीत नव्हते, अशा माय-बाप्पाची दात घासून देण्यापासण तर आंघोळ करून देण्याच काम आनंद मधल्या खऱ्या माणूसकीने केले. कारण त्याला माहीत आहे खरा देव, देवळात कधीच नसतो. पाषाणातला देव पुजण्यापेक्षा माणसातला देव जागवा, असे प्रबोधन आनंदपाल अंबरते आपल्याच वाढदिवशी सत्पखंजेरी प्रबोधनातून करतो.
त्याच्या आईच्या हातच सुग्रास जेवन केक, बरगर, पीजा पेक्षा लाखपटीन सात्वीक त्याच्या वाढदिवशी आम्ही जेवन करतो. त्याला आशीर्वादासाठी उठणारे आमचे हात त्याचे आनंद अश्रु बनते. आनंद अंबरते हा होतकरू तरूण श्रीगुरूदेव पॅथालॉजीच्या माध्यमातून आनेकांना सेवा देत स्वयंरोजगाराची प्रेरणा देतो. प्राकृतिक चिकीत्सा शीक्षण नाशीक येथून त्याने नुकतेच पूर्ण केले. २२ नोव्हेबर आनंदपालचा वाढदिवशी त्याने डाॅ. रोहीत राखुंडे, डाॅ. अनिकेत अंबलकर, संजय सोमकुवर, प्रा. वरोकार, पोलीस अधीकारी वांदे, रेश्मा झाडे या सेवाधीकारींचा सन्मान केला. सर्वधर्मीय प्रार्थनेत श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे चंद्रभान राऊत, रामराव चोपडे आणि लहान गुरूदेव सेवकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचीत समुदायीक प्रार्थना गायली. इस्लामची प्रार्थना मौलाना इर्शाद मोठा ताजबाग यांनी म्हटली. ख्रीस्त धर्माची प्रार्थना रेव्ह. तारेश तायडे यांनी सादर केली. बुध्द वंदना-पंचशील अभिदादा नारनवरे यांनी सादर केली. युवाप्रबोधनकार आकाश टाले, शुभमदादा मोटघरे, मंगेशदादा कामोने आणि उपस्थीतांनी आनंदपाल यांना वाढदिवसाच्या मंगलकामना व्यक्त केल्या.
आपल्या मुलाच्या वाढदिवशी आनंदपाल यांचे वडील अनील अंबरते यांनी स्वतःच्या देहदानाचा संकल्प स्वयंप्रेरणेने सर्वांसमोर जाहीर करून एक आदर्श निर्माण केला. वयाच्या १८ वर्ष पूर्ण केल्यावर आनंदपाल अंबरते यांने स्वतःच्या देहदानाचा संकल्प फॉर्म भरला त्यावर आशिक्षीत आईने सहि केली होती. सुशीक्षीतांना हा एक मोलाचा संदेश आहे.
तरूण मित्रांनो! आपले वाढदिवस केक कापून, केकची मलाई तोंडाला फासून आपल आयुष्य विद्रुप करता, अनेक मित्र दारूच्या नशेत इतर मादक द्रव्यांच्या नशेत धुंद होतात. नशेखोरांपाई अनेक अपघात घडतात. डीजेच्या कर्कश आवाजाने वयोवृद्ध आणि बालकांना, रूग्नांना त्रास देण्यापेक्षा, सेवेचा सन्मान करून खरा आशीर्वाद घ्या. तुमच जीवन मंगलमय होईल. भविष्याच्या आयुष्याचे चांगले संकल्प करां. आई-वडीलांनी अथवा आपण कष्टाने, परीश्रमाने कमवीलेला पैसा योग्य कारणासाठी खर्च करा. आपल्या सभोवताल अनेक गरजू रूग्न औषधी वीना तडफडत असतात, अनेक विद्यार्थी पैशाविना शिक्षणापासून वंचित असतात. अशांना आपल्या मदतीची साथ निरपेक्ष भावनेने द्यां. मंदिरातला पाषाणाचा देव आशिर्वाद देणार नाही. पण ह्या जिवंत देवाच्या दुवा तुमच्या आयुष्याची खरी शिदोरी असणार. खर पुण्य देवपुजेत नाही तर संत महापुरूषांच्या विचारात आहे.
जगातील महापुरूषांनी धार्मीक स्थळांचे उंबरठे झीजवले नाही. तर गरजूंची सेवा केली. संत गाडगेबाबां सकाळी खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचे. तर रात्री किर्तनातून मानवी मनातिल राग, लोभ, मोह, मत्सर, द्वेष आणि माद्यक द्रव्याच्या व्यसनाधीनतेची घाण, अंधश्रध्दा-अंधरूढ्यांची घाण, आपल्या घणघणाती शब्दांच्या प्रहारातून दूर करण्याचा प्रयत्न करायचे. हेच काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन-भाषणातून करायचे. त्यांची खंजेरीची थाप तुमच्या माझ्या आयुष्याला आनंदी जिवन भेटावे म्हणून गरजायची. आपण मात्र संत महापुरूषांना देव केले. महात्मा फुले-सावित्रीआई, छत्रपत्ती शाहु महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून न घेता त्यांना जातीच्या चारभींतीत बंदीस्थ केले.
तरूण मित्रांनो जागे व्हा ! भौतीक सुख म्हणजे जीवनाचा आनंद नाही ते मनोरंजन असते आणि मनोरंजन नेहमीच जीवनाचा घात करते.राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज सामुदायीक प्रार्थनेत म्हणतात-
है प्रार्थना गुरूदेव से।
यह ‘स्वर्गसम संसार’ हो ।
अति उच्चतम जीवन बनेI
परमार्थमय व्यवहार हो॥
ना हम रहें अपने लिए।
हमको सभी से गर्ज है।
गुरूदेव ! यह आशीष दे।
जो सोचने का फर्ज है”
पहा मित्रांनो करता येईल का आनंद अंबरते सारखा अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारा वाढदिवस साजरा ?

