✒️प्रशांत जगताप संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन हिंगणघाट:- स्वतःचे करिअर घडविण्याचे उत्तम क्षेत्र म्हणजे स्पर्धा परीक्षाच आहे.आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी प्रत्येकाने झोकून देऊन अभ्यास करावा. यश हे तुमचेच आहे.स्पर्धा परीक्षेच्या यशातच आई-वडिलांचे सुख असते. असे मत हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पीएसआय दीपेश ठाकरे यांनी व्यक्त केले. शिवाय विध्यार्थ्यांच्या अशा यशासाठी हिंगणघाट शहरामध्ये सर्व सुविधा पुरविणाऱ्या अभ्यासिकेची सोय उपलब्ध करून दिली त्यामुळे सुबोध अभ्यासिकेसह जगदीश वंदिले सर यांचेही त्यांनी अभिनंदन केले. सुबोध अभ्यासिकेद्वारा आयोजित श्रीकांत पेंदाम यांच्या सत्कार कार्यक्रमात पीएसआय दीपेश ठाकरे प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. शरद विहीरकर, प्रा. डॉ. विठ्ठल घिनमीने, प्रवीण काटकर, मधुकर चाफले आदी उपस्थित होते. प्रा. डॉ.शरद विहीरकर यांनी स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी नियोजनाचे महत्व सांगितले तसेच विद्यार्थानी ध्येय निश्चीत ठेवून यशप्राप्ती करावी असे प्रतिपादन केले. तर प्रा. डॉ. घिनमीने यांनी स्पर्धा परीक्षेत संविधान आणि अर्थशास्त्र या विषयांचे महत्व मांडले. सत्कारमूर्ती सुबोध अभ्यासिकेतील विध्यार्थी श्रीकांत पुंडलिकराव पेंदाम यांची (STI- State tax inspector) या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी या यशाचे श्रेय आई, वडील, गुरुजन व सुबोध अभ्यासिकेला दिले.
या कार्यक्रमा प्रसंगी सत्कारमूर्ती श्रीकांत पेंदाम यांना प्रा. उत्तम पोहाने, मारोती नौकरकर, गिरीधर काचोळे यांनी ग्रामगिता भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुबोध अभ्यासिकेचे संचालक जगदिश वंदिले सर यांनी केले तर सूत्रसंचालन ऋषिकेश चौधरी यांनी केले आणि आभार आशिष नन्नावरे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशश्वितेकरिता सुरज खाटीक, विकी मोटघरे, प्रसाद धोटे, अंकित राडे, शशांक, वैभव, कु. नूतन ढोकपांडे, रिंगणे आदीने प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी सुबोध अभ्यासिकेचे व वंदिले क्लासेसचे सर्व विध्यार्थी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348