वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीतील वरिष्ठ कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा दिला आहे.
✒️प्रशांत जगताप संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नवी दिल्ली:- देशातील प्रसिद्ध टीव्ही वृत्तवाहिनी एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. याअगोदर एनडीटीव्हीचे प्रवर्तक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी वृत वाहिनीच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला होता. आज रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीत रवीश कुमार यांचे हम लोग, रवीश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राईम टाईम हे कार्यक्रम लोकप्रिय होते.
रवीश कुमार एक निर्भिड पत्रकार.
आज देशातील पत्रकारितेवर नागरिक प्रश्न चिन्ह निर्माण करत आहे. त्यात रवीश कुमार सारखा निर्भिड पत्रकार आपल्या निर्भिड भाषेत बातमीच्या माध्यमातून स्वतंत्र पत्रकारिता करून गरीब, शेतकरी, कामगार, महिला शिक्षण यांचे सह प्रमुख मुद्दे मांडून सरकारला धारेवर धरलं होते. त्यामुळे ते इतर टीव्ही वृत्तवाहिनी पत्रकारा पेक्षा वेगळे होते. ते कधीही दबावात येऊन त्यांनी आपली पत्रकारिता केली नाही.
रवीश कुमार यांनी थेट ग्राऊंड झिरोवर उतरुन माध्यमांमध्ये दुर्लक्षित होणाऱ्या विषयांना टीव्हीच्या पडद्यावर आणलं. त्यांनी मुक्या विषयाला वाचा फोडण्याचे काम केलं. त्याची पत्रकारिता अन्यायावर प्रहार करणारी होती. रवीश कुमार यांना त्यांच्या पत्रकारितेतील कामाबद्दल दोनवेळा रामनाथ गोयंका या पत्रकारितेतील मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. २०१९ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं देखील त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
रवीश कुमार गेल्या अनेक वर्षांपासून एनडीटीव्ही मध्ये कार्यरत होते. एनडीटीव्ही या वृत्तसंस्थेशी रवीश कुमार १९९६ पासून जोडले गेले होते. एनडीटीव्हीच्या चेअरमन सुपर्णा सिंह यांनी रवीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली. रवीश कुमार यांच्यासारखे लोकांवर प्रभाव टाकणारे कमी पत्रकार आहेत, हे त्यांच्याबाबत लोकांमधून उमटणाऱ्या प्रतिक्रि यांवरुन दिसतं, असं सुपर्णा सिंह म्हणाल्या. रवीश कुमार अनेक दशकांपासून एनडीटीव्हीशी संबंधित होते. एनडीटीव्हीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं, असंही त्या म्हणाल्या.
एनडीटीव्हीचे संस्थापक पाठोपाठ राजीनाम्याचा निर्णय.
एनडीटीव्हीचे संस्थापक अध्यक्ष प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी परवा एनडीटीव्ही वाहिनीच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला होता. काल रवीश कुमार यांनी राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून रवीश कुमार राजीनामा देणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र आज त्यांनी अधिकृतपणे राजीनामा दिला. त्यामुळे रविश कुमार यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
एनडीटीव्हीची मालकी अदानींकडे.
एनडीटीव्ही या वृत्तसमुहाची मालकी आता गौतम अदानी यांच्याकडे गेली आहे. एनडीटीव्हीची प्रवर्तक कंपनी असलेल्या आरआरपीआर होल्डिंगमध्ये अदानी यांचे २९.१८ टक्के शेअर्स आहेत. अदानी यांनी २३ ऑगस्टला यासंदर्भात घोषणा केली होती. तर, २६ टक्के शेअर्स पब्लिक ऑफर्सद्वारे खरेदीची घोषणा केलेली. प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्याकडे ३२ टक्के शेअर्स आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

