✒️नांदेड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नांदेड:- आद्यक्रांतिवीर राजे नोवसाजी नाईक स्मृती प्रतिष्ठान नाव्हा जि.नांदेड या प्रतिष्ठाणचे लोगोचे अनावरण आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे व माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्या हस्ते किल्ले वाफगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
या प्रसंगी नोवसाजी नाईक यांचे वंशज तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाशराव नाईक, बाळासाहेब नाईक, पंढरीनाथ ढाले पाटील, मनोहर नाईक, अविनाश नाईक, विठ्ठल मस्के, अशोक थिटे हे उपस्थित होते. सोबत हिंगोली येथून अनेक मान्यवर उपस्थित होते.
ब्रिटिश व निझाम ह्यांच्या विरुद्ध सतत २० वर्षेहुन अधिक काळ सशस्त्र संघर्ष करून स्वतःच स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे आद्यक्रांतिवीर नोवसाजी नाईक हौसाजी नाईक, यशवंतराव पोले नाईक, लक्ष्मणराव गडदे नाईक यांच्या स्मृती व पराक्रम जपला जावा, इतिहास उजागर व्हावा यासाठी प्रतिष्ठाणची स्थापना करण्यात आली. आज ३ डिसेंबर रोजी वाफगाव येथे चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकर यांच्या जयंती दिनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348