युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नागपूर:- मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चॉकलेट खाल्ल्यामुळे अनेक विद्यार्थांना विषबाधा झाल्याने शाळेत एकच खळबळ माजली आहे. नागपूर येथील मदन गोपाल शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेट मधून 17 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. बाधित विद्यार्थ्यांवर लता मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
काय आहे घटना…
एक अज्ञात व्यक्ती मदन गोपाल शाळेतील गेटवर आला. आज माझा वाढदिवस आहे, असं सांगितलं आणि मुलांना खायला चॉकलेट्स दिली. त्यानंतर त्यातील 17 मुलांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. तीन मुलं अत्यवस्थ असून त्यांच्यावर अती दक्षता विभाग आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे.
चॉकलेट देणारा व्यक्ती कोण होता? याचा तपास आता पोलिस करीत आहेत. अशा प्रकारे चॉकलेट देऊन लहान मुलांना भलतंच काहीतरी खायला दिल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. कुणीही काही खायला दिलं तरी खाऊ नये, असं पालकांनी मुलांवर बिंबवणं गरजेचं आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

