मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नाशिक:- जिल्हातील सटाणा तालुक्यातील वेरूळे गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वेरूळे गावातील उंबरदरी वस्तीत राहणार्या मामा-मामीची आपल्या भाच्यानेच दुर्दैवीरित्या खून केल्याची घटना घडली आहे. कुर्हाडीने वार करून नराधम भाच्याने वृद्ध दांपत्याला संपवले आहे. ९० वर्षीय नारायण मोहन कोल्हे आणि ८५ वर्षीय पत्नी सखूबाई नारायण कोल्हे यांची त्यांचाच भाचा संशयित रामदास भोये यानेच त्यांचा खून केल्याच शनिवारी दी.३सकाळी पोलीस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध दामपत्याचा मुलगा अमरचंद नारायण कोल्हे डोंगरदेवाचा उत्सव सुरू असल्याने गावी आले होते. त्यावेळी वेरूळे यथील उंबरदरी शेतवस्तीत राहणार्या वृद्ध आई वडिलांना भेटण्यासाठी तसेच त्यांनाही उत्सवात घेऊन जाण्यासाठी घरी पोहचले. सकाळच्या सुमारास घरी गेले असता त्यांना त्यांच्या आईचा मृतदेह घराबाहेर तर वडिलांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे दिसले. हे सगळं दृश्य बघून घाबरलेल्या अमरचंद यांनी गावकर्यांच्या मदतीने याबाबत आभोणा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत तपासाला सुरवात केली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348