युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नागपूर:- जिल्हातील कळमेश्वर नुसताच लोक कलावंताचा जिल्हास्तरीय भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय संविधान दिन, बिरसामुंडा जयंती व नववर्षाच्या निमित्य 04 डिसेंम्बर रोजी सातनवरी (टोली) येथील दामोदर सभागृहात विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या कळमेश्वर तालुक्याचे माध्यमातून लोक कलावंतांचा जिल्हास्तरीय भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 5 शाहिरी, 25 भजन, 1 किर्तन, 1 गोंधळ, 1 भारुड, 1 दंडार, 6 भीम गीत व अन्य सांस्कृतिक लोक कालाकार व प्रबोधनकार यांच्या 42 मंडळानी आप आपल्या कला गुणांची प्रात्याक्षिके सादर केली.
या जिल्हास्तरीय लोक कलावंतांचा मेळाव्याचे उद्घाटन नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकर्डे यांचे हस्ते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच नागपूर पंचायत समिती उपसभापती अविनाश पारधी, जिल्हा अध्यक्ष (पिरिपा) नरेंद्र डोंगरे, प्रदेश उपाध्यक्ष राका आकाश गजबे, विदर्भ शाहीर कलाकार परिषदचे केंद्रिय अध्यक्ष भिवगडे, केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेभूर्णै, दयाल कांबळे जिल्हा अध्यक्ष विशाकप नागपूर यांचे विषेश अतिथींच्या मार्गदर्शनात लोक कलावंतांचा सत्कार संपन्न झाला.
यानंतर या मेळाव्यात कलाकारांच्या 42 कलासंचानी सकाळी 11 ते रात्री 7 वाजे पर्यंत आपल्या कला गुणांची प्रस्तुती केली. या प्रसंगी केंद्रीय कार्याध्यक्षांनी सांगितले कि, छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककलेला राजाश्रय दिला होता, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक लोक कलावंतानी हौतात्म्य ही पत्करली. आजचे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नांवावर राज्यकर्ते बनले आहेत, मात्र लोक कलावंताच्या मागणी कडे दुर्लक्ष करीत आहेत.
या प्रसंगी नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकर्डे व जि प सदस्य सलील देशमुख यांनी लोक कलावंताच्या मागण्याचा पाठपुरावा शासन दरबारी मांडण्याचे सांगितले. याप्रसंगी नामवंत शाहीर गरिबा काळे, युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ नागपूर, गीतगायक राहुल वानखेडे, शाहीर यादवराव कानोलकर, शाहीर मनोहर धनगरे, पांडुरंग डाखोळे, शाहीर ज्ञानेश्वर तायवाडे, पुरुषोत्तम निघोट, मानेराव गुरुजी, उर्मिलाताई वाडी. या कार्यक्रमाचे संयोजन शाहिर गौरीशंकर गजभिये, दिलिप आस्कर, संजय खांडेकर, अशोक लोणारे, रामदास मानेराव, शाहीर अशोक नेरकर, यांनी केले. तर निर्मला माहुलकर, ज्ञानेश्वर गावंडे, पुरुषोत्तम कुंभे, प्रभा निंबाळकर, पांडुरंग डाखोळे, सुरेश ढगे ,प्रभाकर निंबाळकर, नथुजी ढोक, चंद्रकला वाघमारे , राधाताई आसोले शिल्पा बुरडे, इतर निर्मला बांबल, तालुका तसेच जिल्हा पदाधिकारी यांनी या आयोजनाच्या सफलतेसाठी पथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहीर गौरीशंकर गजभीये तर संचालन विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे तालुका अध्यक्ष अरुणभाऊ वाहने यांनी केले तर आभार प्रदर्शन नागपूर ग्रामीण तालुका महासचिव संजयराव खांडेकर यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348