Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

६ डिसेंबर आणि मुंबईचा प्रवास……!

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 5, 2022
in Uncategorized, महाराष्ट्र
0 0
0
६ डिसेंबर आणि मुंबईचा प्रवास……!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बंडखोर कवी लेखक: गिरीश जाधव, पुणे

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन मुंबईला जायचा योग, माझा तसा म्हटल तर ६ डिसेंबरला हमखास असतो. त्या दिवशी पुणे येथुनं रेल्वे बिना टिकिटं असतात. हजारो भिमसैनिकं निळा झेंडा घेत, पुणे येथुनं मुंबईला रवाना होतात. मी पण या पुण्यातील कार्यकरत्यांन समवेत मुंबईला जात असतो सहा डिसेंबर या दिवशी महामानवं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिर्निवांण या दिवशी झाले होते. म्हणुनं त्यांनला अभिवादनं करण्यासाठी देश भरातुनं लाखो अनुयायी या मुंबईच्या चैत्यभुमीला जमतं असतात. एक दिवस अगोदरं पासुनं या भुमीवर देशभरातुन जनसागरं लोटतं असतो. भव्य दिव्य सामाजिक संघटना यांनी मोठ मोठाले व्यासपीठ उभा केलेले या परिसरात असतात. याचं परिसरात अन्नदान, फळे वाटप, पुस्तके वाटप, झोपण्यासाठी कुठे सरकारी शाळेच पटांगण किंवा दुसरीकडे कुठे मनपा शाळा… काय नाही तर सरळ रस्त्यावर लोक झोपी गेलेले असतात. कीती ही वेडी भिम सैनिकांची बाबासाहेबांनवर आंधळी श्रध्दा. आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वेच्या टपावर चढुनं प्रवास करायचा, हे धाडस त्या दिवशी कुठुनं या लोकांन मध्ये संचारत असते. तर बाबासाहेब यांच्या विचार प्रेरणेतुन व विचार मंथनातुन हे धाडस लोकांच्या अंगी वलयंक्त झालेले असते असे माझे म्हणे चुकीचे ठरणार नाही.

एक सहा डिसेंबर माझ्या मनातं आठवणं करूणं गेला, तस मुंबईला बहुदा माझी जाण्याची ती पहिलीच वेळ असावी, माझा एक पुण्यातील मिञ मला म्हणाला, उदया जावु आपण मुंबईला चैत्यभुमीवर… मी नेमी सारख त्याला म्हणालो, पैसे नाही आहे माझ्याकडे… तर तो माझा मित्र मला म्हणाला, कशाला पाहिजे पैसे, तु असं कर उदया सकाळी पाच वाजता, तु ये रेल्वे स्टेशनं वर मी करतो काय करायचे. मी दिलेल्या वेळेस पोचला रेल्वे स्टेशनं वर. हा घडी तिकडं घडयाळा खाली उभाच होता. एक मोठी एक्सप्रेस आली. मी हा माझा मिञ चढलो आम्ही एक्सप्रेस मध्ये, आता मला वाटल यानी टिक्ट्ं काढलं असेलं दोन जणांचे. तर या बहादुर माणसानी टिकिट काय काढलं नव्हते. तस पुणे पासुन ज्या गाडया निघतात, त्यांनला या दिवशी टिकिट नाही काढली तरी चालते. पण पंजाब पासुन ज्या रेल्वे मुंबईकडे पुणे मार्गी येतात, त्यांनला पुकट प्रवास ही भानगडं नसते. Tickets must be compulsory…. गाडीत टिकिट चेकर आला. आम्हाला टिकिट विचारलं, मी सरळ माझ्या मिञाकडे बोट दाखवले. त्या टि.सी ला सांगितले… याला विचारा म्हण्टलो, आता हा माझा मिञ पेपर वाचत बसला होता. पेपर वाचताना त्याला कुणी डिस्टर्ब केलं, तर हा माझा मिञ खुप पिसळतो. म्हणजे या मिञाचा एक किस्सा सांगतो. पेपर म्हणजे या माझ्या मिञाचा जीव की प्राण, हा घरात पेपर वाचत बसायचा, याची बायको सारखी याला बोलायची आओ पेपर सोडा पहिला आपल्या मुलाला शाळेत सायकल वर सोडुन या… आपल्याला पेपर वाचण्यात आपला हा मुलगा व्यत्यं आहे. म्हणुन या माझ्या परम मिञानी त्याच्या मुलाला कायमचे हॉस्टेल ला टाकले होते. तसा हा टिकिट चेकर आमच्या वर वैतागला होता. हा मिञ त्या टिकट चेकरला सरळं म्हणाला…. तुला समजते का काय मी पेपर वाचत आहे. जगातल्या घडामोडी मी माझ्या नजरे खाळुन काढत आहे. तु मला ञास देऊ नको अन्यथा माझ्यातला भिमसैनिक जागा होईल मंग पंजाब , गुजरात, मराठा यात तुंबळ युध्दं होईल जा तु माझ्या नजरे समोरून.. जा…., जा…. तु दुसरंयाच्या टिकिट चेक कर… मुझे पेपर पडणे दो दुनिया देखणे दो…. टिकिट चेकर है नही चलैंगा, है यैसा कभी, नही पहिला टिकिट बतावो …… आता या दोघांची जुंपली बहुदा उल्लास नगरला पोलीस चौकी आपल्या नशीबात आहे, असे मला वाटु लागले, मी एकदम डोके खाली करूण बसलो….. तो टिकिट चेकर आयकायलाच तयार नाही. तो म्हणाला, देशाचा पंतप्रधान आला तरी, तुम्हा दोघांनला मी माफी करणार नाही. तो पंजाबी टिकिट चेकर खुप हाटके होता. तो आयकणारच नाही, असे मला व माझ्या या बहादर मिञाला वाटत होते. मी सरळ सांगितले, माझ्या या मिञाला आपण फस्ट क्लास मध्ये चढलोय जनरल ला यांनी आपले ऐकले असते, आता हा रेल्वे पोलीस बोलवुन आपल्याला अटक करेल ….. आपण कलटी घेवु…..माझा मिञ म्हणाला कशी कलटी घ्यायची, काय करायचे मग आता, मी सरळ मिञाला सांगितले, कर्जतला गाडी हळु झाली की गाडीतुनं उडया मारायच्या तर ठरलं कर्जतला उडया टाकायच्या. जशी गाडी हळु झाली तशी. पहिला मी गाडी खाली उडी टाकली लगेच माझ्या मिञानी माझ्या पाठोमाग उडी टाकली गाडी खाली ,, जसा काय चिञपटाच्या शॉर्टच चिञिकरण चालु आहे रेल्वे रूळावर ….. तसं कर्जत पर्यंत आम्ही दोघे मिञ आलो. पण आता पुढे दादर कसे गाठायचे, दोघांनकडे पैसे नाही. एकदम दोघे जण भुके कंगाल मी सकाळी घरातुन पहाटे चारला निघालो होतो, घरच्यांनला माहिती पण नाही की मुंबईला गेलो आहे. आता प्रश्न होता दादरला कसे पोचायचे….. कर्जत वरून लोकल गाडी एकदम वेगाऩं दादरला निघते या लोकल मध्ये बसायचे असे ठरले. लोकलने वेग घेतला या लोकल मध्ये ही आम्ही दोघे बिना टिकिटाचेच मिञ होतो. येवढी लोकल ला गर्दी, या गर्दीत टिकिट चेकर हारवलेला होता….. आमची आणि टिकिट चेकरची काय गाठ गाडीत पडलीच नाही.

चैत्यभुमी परिसरात आम्ही पोचलो, तात्तकालीनं मुख्यमंञी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कराय आले होते. मंत्री, संत्री, आमदार खासदार, नगरसेवक यांच्या बरोबर मी आणि माझा तो मित्र बिना टिकिटवाला आम्ही सगळे चेैत्यभुमीत बाबासाहेबांनला वंदन करीत होतो. टीव्ही वर लाईव हा कार्यक्रम दाखवत होते. आम्हा दोघां मिञांनला टि.व्ही वर पुण्यातील आमचे चळवळीतील असंख्य मिञ पाहत होते. या आमच्या पुण्यातील मिञांची छाती गर्वाने पुगत होती आम्हा दोघा मिञांनला टि.व्ही वर बघताना. पुण्यातील लोक असे म्हणतं होते हेच दोघे चळवळीतील खरे कार्यकरते आहे… पण आमची ही आळी मिळी गुप चिळी कोणालाच माहिती नव्हते. फक्त आम्हा दोन मिञांनलाच ही करामत आमची माहिती होती. आता चैत्यभुमीवर वंदन तर
बाबासाहेबांनला झाले होते ते पण मुख्यमंत्र्या समवेत आता अस ठरलं, परिसरात खुप पुस्तकाचे दुकानं लागली होती. म्हंटले.. जरा हा परिसर फिरू या, तस तिकडच्या पोलीसांनी आम्हा दोघा मिञांनला मुख्यमंत्र्याशी संवाद साधताना पाहिले होते. म्हणुनं स्मारकातुन बाहेर निघताना, मुंबई पोलीस आम्हा दोघा मिञांनला वाट करूण देत होते. आम्ही दोघे मिञ मनातल्या मनात हसत होतो. रेल्वेत टि.सी पोलीसांच्या स्वाधीनं आम्हा दोघांनला करत होता, या घटनेला दोन तास फक्त झाले होते, तर इकड दोन तासा नंतर पोलीस आम्हाला संरक्षण देत गर्दीतुन वाटं काढुनं सही सलामत बाहेर काढतं होते. काय हे आमचं नशिब बिन रूपयाच. हा परिसर फिरताना असंख्य लोक मला जयभिम करत होते, कोण आर्वजुनं मला भेटाय यायचे. लगेच त्यांच्या पुस्तक स्टॉवर घेवुन मला जायचे, मला चहा नाष्टा देयचे माझ स्वागत करायचे. माझा मिञ मला सारखा बोलायचा मला हे सगळ माहित होतं, तुझी सगळी इकड मुंबई मध्ये व्यवस्ता होईलं, म्हणुनं मी तुला म्हणालो, होतो तु काय काळजी करू नको, तु बाप माणुस आहे, कुठुनं कसे पाणी काढायचे हे तुला फार चांगले माहित आहे. एखादया वेळेच नळाला पाणी नसले तर हापशावर कशी रांग लावत आपला हंडा भरायचा याचे कौशल्य तुझ्याकडे आहेच की. मुंबई ही तुझी आहे. संध्याकाळचे चार वाजत आले होते. आमचे जेवणं झाली होती. मुंबईतील लोक मुरलीधर जाधवांचा मुलगा म्हणुनं मला त्यांच्या व्यासपीठा वर घेवुन जायचे, माझा सत्कार करायचे, मला पुस्तक भेट देयचे, असे हा परिसर फिरताना पंचविस दलित साहित्या वर अधारीत पंचविस पुस्तके भेट म्हणुनं मला व माझ्या मित्राला आले होते. आता हा माझा मित्र मला हळुचं म्हणतो कसा…. आरे बाबा तु, हजार पाचशे कोणा कडे तरी माग नुसता हार फुलं काय स्विकारत बसलायं….. तस मी एकजणाच्या उरावर बसलोच हजार रूपया साठी, माझ्या वडीलांची कादंबरी एक प्रकाशन संस्था चैत्यभुमी परिसरात विकत होती, मी सरळ प्रकाशन संस्थेला सांगितले, मी पुणे येथुन चळवळीतील कार्यकरते घेवुन आलो आहे. पण आता मला परत पुण्याला जायला माझ्याकडे पैसे कमी आहे., या प्रकाशन संस्थेने मला सरळं एक हजार रूपय काढुनं दिले…. मी व माझा मित्र एकदम खुश झालो. तो मित्र मला म्हणाला, पहिला एका चांगल्या हॉटेलात जावुन, मुरग्ं मसलमं आपण खावु, मी त्याला म्हणालो, सगळे पैसे खाण्यात गेल्यावर गाडी भाडयाच मग कस करायचं… माझा मित्र म्हणतो कसा, तु कशाला त्याची काळजी करतो, मी आहे ना, रेल्वे हळु झाली, की घेयच्या उडया पाठी मागच्या रुळावर आणं ताडिवाला रोड नजीक रस्त्यावर निघायचे, ओके तर ठरलं उडया मारायच्या, आम्ही दोघांनी एक हॉटेलात जेवण केली, मुंबईचा एक नाक्का आहे, त्याला पुलावर पण म्हणतात अखेर मी व माझा मित्र पुलावर येवुन उभा राहिलो. तेवढयात एक भली मोठी आलिशान गाडी रस्त्याने चालली होती, त्या आलिशान गाडीच्या ड्रायवरने मला ओळखले तो गाडी बाजुला सारत मला म्हणाला, कोण गिरीष का.. आरे काय मिञा कीती दिवसानी तु मला भेटतोय मी तुला वर्तमान पञातुन वाचत असतो,.. हा माझ्या शाळेतील मित्र होता. पुण्यात सोलापुर बाजारात राहणारा. तो मला म्हणाला, इकडं मुंबईला कसा. मी सगळा वृतांत त्याला सांगितला… तो माझा ड्रायवर मित्र मला म्हणाला, मी पण पुणे येथे निघालो आहे,,, चल बस गाडीत सोडतो तुला, तुझ्या घर पोच,, माझा बिना टिकिटवाला मित्र लय खुश, एवढया मोठ़या आलिशानं वंडरफुल गाडीत तब्बलं तिन साडेतिन तास बसाय भेटलं आणि ते ही ए.सी.मध्ये दुधात साखर लगेच माझ्या कानात हा माझा मित्र ओरडायचा…. गिरीष जाधव झिंदाबाद… म्हणुन ती आलिशानं गाडी Express Highway पकडत पुण्याकडे निघाली होती. मी आणि माझा तो युक्ती वादी मित्र आम्ही विचार करत होतो, काय आमचं हे चळवळीतील जीवन, “दिल्या भाकरीशी ! नाव मोठ लक्षणं खोटं… खिशात रूपया नायं, पण चळवळीचा निळा झेंडा आमच्या खांदयावर. खरचं चळवळीत कोण चुकल या चळवळीत फाटाफुट कोणी केली, कोणी ही चळवळ इतर पक्षाच्या गळयाला लावली एक आमदारकी एक खासदारकी साठी, या चळवळीत बाबासाहेबांनला विकणारे माणस अजन्म सत्तेत राहात, तुझ्या माझ्या सारख्या कार्यकरत्याची ही हाल ही रेळ आहे. साध मरता मरता आपल्या नशिबात हॉनरी मॅजिस्ट्रेत हे पद नाय, कधी हे विखुरलेले निळे पाखरं या आंबेडकरी चळवळीच्या चौकटीत एकत्र येईलं का..? माझा मित्र मला म्हणाला चल जयभिम रात्र बरीच झाली आहे, मी निघतो, उदया भेटु आपल्या नेमीच्या टियावर म्हणजे इराण्याच्या हॉटेलात, चल निघु या जय भिम….

Previous Post

“भिमराव रामजी आंबेडकर” मराठी कविता.

Next Post

सातनवरी (टोली) येथे लोक कलावंतांचा जिल्हास्तरीय भव्य मेळावा संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सातनवरी (टोली) येथे लोक कलावंतांचा जिल्हास्तरीय भव्य मेळावा संपन्न.

सातनवरी (टोली) येथे लोक कलावंतांचा जिल्हास्तरीय भव्य मेळावा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In