मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नाशिक:- शहरातील हिरावाडी व कैलास नगर परिसरात चोरट्यांनी खिडकीचे गज कापून व सेफ्टी डोअर तोडून घरफोडी करीत सुमारे साडे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी पंचवटी व आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
गायत्री अविनाश बस्ते रा. हिरावाडी यांनी पंचवटी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३ ते ४ डिसेंबर दरम्यान खिडकीचे गज कापून त्यावाटे घरात शिरला. घरातील सोन्याचांदीचे दागिने, रोकड व संगणक असा एक लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत भरत बारकू फड २९, रा. कैलास नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३ ते ४ डिसेंबर घराचे कुलूप तोडून घरातील रोकड व सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे फड यांच्या शेजारी राहणारे राजेश लाटे यांच्या घराचे सेफ्टी डाेअर तोडून त्यांच्या घरातील किंमती ऐवज लंपास केलाआहे. सोयाबीन विक्री करून आलेले एक लाख ३० हजार रुपयांची रोकड, १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, टीव्ही असा एकूण एक लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने दोन्ही घरातून लंपास केला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

