✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन वर्धा:- महावितरण’ने पूर्व विदर्भातल्या पाच जिल्ह्यांत शेतकऱ्यांसाठी १२ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयातून वर्धा जिल्ह्याला वगळले आहे. हा भेदभाव का? हा जाब विचारण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या उपस्तितीत महात्मा गांधी पुतळा चौक वर्धा येथे आंदोलन पुकारले होते. त्यास माजी ऊर्जा मंत्री तथा वर्धा जिल्हा संपर्क मंत्री आ.प्राजक्तजी तनपुरे सह माजी आमदार प्रा.राजु तिमांडे उपस्थित राहून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला व जिल्हाधिकारी कर्डिले साहेब यांना निवेदन देण्यात आले.
अस्मानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना महावितरणकडून रात्रीचा वीजपुरवठा करण्यात येत असल्याने वन्यजीवांच्या भीतीने, कडाक्याच्या थंडीत शेतकरी जीवमुठीत घेऊन शेतात रात्री पिकांना पाणी देत आहेत. वीज वितरण कंपनीकडून सुरू असलेली वीज बिल वसुली अन्यायकारक आहे. महावितरणकडून शेतीपंपाची वीज तोडणी सुरू आहे. ती तात्काळ थांबविण्याचे आदेश शासनाने द्यावे. राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांचे समाधान शासनाने करावे हा आमचा इशारा आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल.
त्यावेळी माजी आमदार सुरेशभाऊ देशमुख जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे,दिवाकरजी गमे, वर्धा विधानसभा अध्यक्ष मिलिंद हिवलेकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष धनराज तेलंग, विधानसभा अध्यक्ष संजय तपासे, आर्वी विधानसभा अध्यक्ष गोपालजी मरस्कोल्हे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई देशमुख, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष नावेद शेख, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव शिवराज शिंदे,राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष संदीप किटे, हिंगणघाट राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष विठ्ठल गुळघाने, सचिन परसाडे,मुन्ना झाडे, विनय डहाके, प्रवीण पेठे, शैलेश घोडमारे,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष हरिश काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सूरज वैद्य, आफताब खान, समुद्रपूर बाजार समिती सभापती हिम्मतसिंग चतुर, प्रलय तेलंग, दशरथ ठाकरे,विजय सुरकर, प्रवीण काटकर इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

