✒️अमरावती जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन अमरावती/वरुड:- शहरातील पारडी बोराग परिसरातील बेकायदेशीर रित्या घरात घुसून चोरी करणे संबंधित आरोपी नामे नागेश तायडे यावर कलम 380 454, 457, 411 भा.द.वी प्रमाणे गुन्हा नोंदवून व तपास पूर्ण करून पोलिसांनी पाच विविध दोषारोप पत्र वरूड न्यायालयात दाखल केले होते. आरोपी हा गरीब असल्यामुळे व जेलमध्ये असल्यामुळे आरोपीच्या विनंतीवरून विधी न्यायाधिकरण मार्फत एडवोकेट अंकिता रा. जयस्वाल तसेच एडवोकेट तौसिफ कुरैशी यांची नियुक्ती करण्यात आली.
वरुड न्यायालयात नागेश तायडे यांची बाजू मांडताना एडवोकेट अंकिता जयस्वाल यांनी म्हटले की, नागेश तायडे याचे विरुद्ध खोट्या केसेस दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतली व संबळ पुराव्या अभावी नागेश तायडे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
आरोपी विरुद्ध दाखल केलेल्या पाच केसेस मधून दोन केसेस मध्ये वरूड न्यायालयाने दिनांक 22 जुलै रोजी आरोपीला निर्दोष मुक्त केले. त्यानंतर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आले.
तसेच दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दोन्ही केसेस मधून आरोपीला निर्दोष मुक्त केले वरील प्रमाणे एकूण चार केसेस मध्ये ॲड. अंकिता जयस्वाल व एक केस मध्ये ॲड. तौसिफ कुरैशी यांनी आरोपीतर्फे यशस्वी युक्तिवाद केला. वरील सगळ्या केसेस मध्ये वरूड न्यायालयाने नागेश तायडे याला निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348