अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन सावनेर:- युवक जागृती मंडळ व सुधाकर बागडे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बसस्थानक जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा येथे सामुहिक बुद्ध वंदना व विनम्र अभिवादन कार्यक्रम भाजप नेते रामराव मोवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आले. अभिवादना नंतर शैकड़ो समाज बांधवांच्या उपस्थिति सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी सावनेरचे ठाणेदार मारोती मुलुक, युवक जागृति मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बागडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापति बाबाराव पाटील, शिवसेना मा. तालुकाप्रमुख उत्तम कापसे, पत्रकार अरुण रुषीया,प्रा साहेबराव विरखरे,राजु घुगल, एपीआय निशांत फुलेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
या अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचीव विक्की शेंडे, संचालन स्तुप बागडे आणि आभार प्रदर्शन अंजलि कनोजिया यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय बागडे, होमेश्वर डोंगरे, चंदु गोंडुळे, सोनु गजभिये, अमीत गायकवाड़ यांनी परिश्रम केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348