अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर, दि. 6डिसेंबर:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 व्या महापरीनिर्वाण दिनी सावनेर येथे विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांनी अभिवादन केले.
यावेळी राजू खांडे (नागपूर जिल्हा सचिव राष्ट्रवादी कांग्रेस), दिनेश इंगोले (जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड संघटना), सुधाकर तिबोले (जिलाध्यक्ष कामगार सेल), सुभाष मछले (शहर अध्यक्ष शिवसेना), प्रशांत ठाकरे (महासचिव नागपुर जिल्हा ग्रामीण कांग्रेस कमेटी), दिलावर शेख (जिल्हा सचिव कांग्रेस कमेटी), गेंदलाल कमाले, गजेंद्र कोमुजवार, अनूप पठाने, बापू कामोने, किशोर चनेलिया, चंदू पूरे, सदाशिव गुरकारी, अश्विन महाजन, राजू सोनटक्के, देविदास पूरे, इंद्रजीत गडकोंडाले, पिंटू सावजी, सोनू शेळके, गोलू विरसेन, मनोहर जामदार, बाबू रुशिया इत्यादि पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होते.