सौ.हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपुर:- जील्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भावी वराने म्हणजे होणाऱ्या नवऱ्याने लग्नास नकार दिल्याने एका युवतीने त्याच्याच कार्यालयासमोर म्हणजेच न्यायालया समोर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी उघडकीस आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्हातील ब्रम्हपुरी येथील दिवाणी न्यायालयाच्या निर्माणाधिन इमारतीच्या गेटवर काल सकाळच्या सुमारास एका भावी वधु होणाऱ्या युवतीने गळफास घेतलेले आढळून आले. त्यामुळे संपूर्ण न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. पौर्णिमा मिलिंद लाडे या वय 27 वर्ष असे आत्महत्या केलेल्या भावी वधूचे नाव आहे. ही घटना मंगळवार ला पहाटेच्या सुमारास पौर्णिमा मिलिंद लाडे हीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. ही तरुणी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात असलेल्या कोरेगाव (चोप) येथील रहिवाशी असून, सचिन शेंडे या ब्रम्हपुरीत राहणाऱ्या तरुणासोबत दीड वर्ष आधीच तिचा साखरपुडा झाला होता. सचिन हा ब्रम्हपुरी च्या दिवाणी न्यायालयात चपराशी पदावर कार्यरत आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
साखरपुडा झाल्यानंतरही होणारा नवरा लग्नास टाळाटाळ करत असल्याने मुलीने टोकाचे पाऊल उचलले आणि त्याच्याच कार्यालयाच्या गेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारी वरून सचिन शेंडे वर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
सामान्य नागरिकांची घटनास्थळी गर्दी
मात्र ब्रम्हपुरीमधील दिवाणी न्यायालयाच्या अगदी प्रवेश द्वारावर मृतदेह आढल्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सामान्य नागरिक आणि पोलीस यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी घटनास्थळी झाली होती.