सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर/राजुरा:- भारतीय बौद्ध महासभा राजुरा आणि राजुरा शहर शाखा रामपूर, बामणवाडाच्या वतीने बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 6 डिसेंबर 2022 रोज मंगळवार ला सकाळी संविधान चौक राजुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.
प्रथमतः भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका अध्यक्ष आयु. धर्मु नगराळे तसेच कोषाध्यक्ष आयु. गौतम देवगडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केले तसेच यंग मेन्स बुदिस्ट वेलफियार असोसियन राजुरा बस स्टण्ड समोर राजुरा येथील सर्व पदाधिकारी यानी पुष्प अर्पण करून सामूहिक त्रिशरण पंचशील,बुद्ध वंदना घेण्यात आली.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभाचे अध्यक्ष आयु. धर्मु नगराळे, कोषाध्यक्ष गौतम देवगडे, रमेश नळे, भिमराव खोब्रागडे, चरणदास झाडे, प्रवीण बंड, गौतम जुलमे, मुरलीधर ताकसांडे, अशोक मून, ईश्वर दुपारे, बंडू वनकर, दुबे, मेघाताई बोरकर, वंदना देवगडे, राणी नळे, पौर्णिमा ब्रम्हणे, कमल टेकाडे, भारती मून, किरणताई खैरे, प्रेमिला नाळे, मालाताई तामगाडगे, मंजुषा दूपारे, पौर्णिमा रामटेके, वनिता मून, सोनिया अंबादे, रंजना ताकसाडे, नंदा पुसाटे तसेच राजुरा शहरातील आंबेडकर वॉर्ड, सोमनाथ पुर वॉर्ड, रमाबाई वॉर्ड, इंदिरा नगर, चुंनाभट्टी वॉर्ड इत्यादी बौद्ध उपासक व उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.